Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २० जुलै, २०२१, जुलै २०, २०२१ WIB
Last Updated 2021-07-20T05:45:20Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Job 2021: टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोमध्ये बंपर भरती, १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना संधी Rojgar News

Advertisement
Recruitment2021: करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने अर्थव्यवस्था कोलमडली असताना आता तिसऱ्या लाटेची भीती वर्तविण्यात येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नोकऱ्या जाऊन बेरोजगार झालेल्यांची संख्या मोठी आहे. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता तरुण वर्ग चिंतेत आहे. पण टेक्निकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काळजी करण्याचे कारण नाही. भारतात औद्योगिक सेवा पुरविणाऱ्या टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (TCS), आणि विप्रोने यावर्षी शिक्षण संस्थांमध्ये कॅम्पसच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थ्यांना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. आपल्या भविष्याची काळजी करणाऱ्या तरुणांसाठी ही महत्वाची बातमी आहे. या भरतीचा शिक्षण संस्थांना देखील फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये टीसीएसच्या भारतातील कॅम्पसमध्ये ४० हजारून अधिक फ्रेशर्सना संधी देण्यात येणार आहे. एचआर प्रमुख मिलिद लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार५ लाख कर्मचारी संख्या असलेल्या मोठ्याा कंपनीत २०२० मध्ये ४० हजार विद्यार्थ्यांना कामावर ठेवण्यात आले. यावर्षी देखील इतक्याच विद्यार्थ्यांची भरती केली जाणार आहे. इन्फोसिसच्या योजनेअंतर्गत या आर्थिक वर्षामध्ये ३५ हजार विद्यार्थ्यांना नोकरी दिली जाणार आहे. जूनच्या अखेरपर्यंत इन्फोसिसमधील कर्मचारी संख्या २.६७ लाख होती तर मार्च अखेरीस ही संख्या २.५९ लाख होती. डिजीटल कौशल्याची मागणी वाढण्यासोबतच उद्योगांमध्ये वाढ होतेय. यामुळे भविष्यात नोकरी उपलब्ध करुन देण्यास कंपनी सक्षम असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी सांगितले. विप्रोचे सीईओ थिअरी डेलोपोर्ट यांच्या म्हणण्यानुसार, चांगली नोकरी सोडावी लागणे हा तसा सार्वत्रिक मुद्दा बनला आहे. हे आव्हान समजू शकते आणि यासाठी वेगाने काम करत आहे. कंपनी यावर्षी ३० हजारहून अधिक अधिक ऑफर लेटर देणार आहे. ३० हजार ऑफर लेटरमध्ये साधारण २२ हजार फ्रेशर्सची भरती केली जाणार असल्याचे ते म्हणाले. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीच्या ऑनबोर्डवर २ हजार फ्रेशर्स होते. तर दुसऱ्या तिमाहीत ६ हजार फ्रेशर्सना नियुक्त केले गेले. कंपनीने या आर्थिक वर्षाच्या तिमाहीनंतर २ लाख ९ हजार ८९० कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याचे सांगितले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Bn8Pe4
via nmkadda