Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १७ जुलै, २०२१, जुलै १७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-17T06:47:40Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Job2021: करोना काळात नोकरी शोधताय? या मोबाइल अॅप्सची घ्या मदत! Rojgar News

Advertisement
Job2021: करोना काळामध्ये नोकऱ्या जाऊन अनेकजण बेरोजगार झाले. अशावेळी लगेच दुसरी नोकरी कुठे शोधायची असा अनेकांना प्रश्न पडतो. पण आजकाल नोकऱ्या शोधणे हे आधीच्या तुलनेत अधिक सोपं झाल्याच दिसून येतंय. अनेक मोबाइल अॅप्स आहेत जे तुम्हाला नोकरी शोधण्यास मदत करतात. तुम्ही दिलेले प्रोफाइल मॅच करुन त्याप्रमाणे नोकर भरतीची माहिती मोबाइल अॅप्सद्वारे दिली जाते. अशा काही अॅप्लीकेशन्सबद्दल जाणून घेऊया लिंक्डइन लिंक्डइन ही प्रोफेशनल नेटवर्किंग साइट म्हणून प्रसिद्ध आहे. मोठ्या पदांवर काम करणाऱ्या अनेक व्यक्ती या साइटवर दिसून येतात. पण ही केवळ प्रोफेशनल नेटवर्किंग साइट नाहीय. तर नोकरी शोधण्याचे एक महत्वाचे माध्यम आहे. तुम्हाला पाहीजे असलेल्या ठिकाणाच्या आधारे नोकरी मिळवून देण्यास हे अॅप तुम्हाला मदत करते. यासंदर्भातील नोटिफिकेशन तुम्हाला पाठवले जातात. इथे लिंक्डइन प्रोफाइलच्या माध्यमातून अर्ज करण्याची सुविधा आहे. तुम्ही नोकरी देणारी कंपनी, नोकरीचे पद याआधारे देखील फिल्टर करु शकता. तुमच्याा प्रोफाइल्सला मॅच करुन नव्या नोकरीबद्दलची माहिती तुम्हाला दिली जाईल. नोकरी शोधण्यासाठी युजर्सच्या प्रायव्हसीची काळजी इथे घेतली जाते. अॅण्ड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसमधून हे अॅप्लीकेशन डाउनलोड करता येऊ शकते. ग्लासडोर नोकरी शोधण्यासाठी या अॅपची मदत देखील तुम्ही घेऊ शकता. इथे नोकरी शोधण्याव्यतिरिक्त देखीन अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या कंपनीमध्ये नोकरी करण्याची तुम्हाला इच्छा आहे, त्याचा रिव्ह्यू तुम्ही इथे वाचू शकता. तुमच्या प्रोफाइलच्या हिशोबाने तुम्हाला किती पगार मिळू शकतो? याबद्दल देखील इथे माहिती मिळते. तुम्हाला इथे व्यवस्थापकीय, व्यवसाय, बांधकाम, सल्लागार, ग्राहक सुविधा, इंजिनीअरिंग, फायनान्स, हेल्थकेअर, आयटी, सेल्स, शिपिंग, सॉफ्टवेअर क्षेत्रासंदर्भातील नोकरीच्या संधी मिळू शकतात. हे अॅप्लीकेशन अॅण्ड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर देखील उपलब्ध आहे. जिप रिक्रूटर हे देखील एक उपयोगी एप आहे. इथे जॉब शोधणे खूप सोपे आहे. इथे कौशल्य, अनुभव, पगाराच्याआधारे नोकरी शोधण्याची सुविधा देण्यात आली आहे. जर तुमचे जॉब प्रोफाइल मॅच करत असेल तर त्यासंदर्भात तुम्हाला नोटिफिकेशन पाठविले जाते. इथे रेझ्युमे डाऊनलोड करण्याची सुविधा मिळते. एका क्लिकवर नोकरीसाठी अप्लाय करण्याची संधी तुम्हाला मिळते. इथे मीडिया, नर्सिंग, लॉजिस्टिक्स अशा अनेक विभागातील नोकऱ्या शोधल्या जातात. हे अॅप अॅण्ड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाइसवरुन डाऊनलोड करु शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xHYiYK
via nmkadda