MDL Recuitment 2021: माझगाव डॉकमध्ये १३८८ पदांची भरती, सरकारी नोकरीसाठी अर्ज करा Rojgar News

MDL Recuitment 2021: माझगाव डॉकमध्ये १३८८ पदांची भरती, सरकारी नोकरीसाठी अर्ज करा Rojgar News

MDL Recuitment 2021: माझगाव डॉकमध्ये शिपबिल्डर्स (एमडीएल) लिमिटेडमध्ये मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एमडीएलने नॉन-एग्झिक्यूटीव्ह प्रकारात १३८८ पदांची भरती काढली आहे. यासाठी जाहीरात देण्यात आली आहे. या पदांवर अर्ज करण्याची प्रक्रिया ४ जुलै २०२१ ला संपणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आतापर्यंत अर्ज केला नसेल तर अधिकृत वेबसाईट mazagondock.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकता. अर्जाची प्रक्रिया ११ जून २०२१ ला सुरु झाली आहे. निवडलेल्या उमेदवारांना कॉंट्रॅक्टवर भरती केले जाणार आहे. या उमेदवारांचा कालावधी ३ वर्षांचा असेल जो पुढे २ वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. पात्रता आणि निवड प्रक्रिया एमडीएल नॉन एग्झिक्यूटीव्ह भरती २०२१ नोटीफिकेशनुसार पदांनुसार शैक्षणिक पात्रता ठरवली गेली आहे. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन पाहा. सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय १८८ वर्षांपेक्षा कमी आणि ३८ वर्षांपेक्षा अधिक असू नये. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. शिपबिल्डर्स (एमडीएल) मध्ये नॉन-एग्झीक्यूटीव्ह कॅटेगरी पदासाठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षा, त्याचा अनुभव आणि ट्रेड टेस्टच्या आधारे केली जाईल. विविध टप्प्यांमध्ये झालेल्या निवड प्रक्रियेच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल. यानंतर अंतिम निकाल घोषित करुन उमेदवाराची निवड होईल. उमेदवार एमडीएलच्या वेबसाईटवरील करिअर सेक्शनमध्ये जा. भरतीसाठी संबंधित लिंकवर क्लिक करा. पुन्हा नव्या पेजवर नॉन एक्झिक्यूटीव्ह लिंकवर क्लिक करा. दिल्या गेलेल्या लिंकवर मागितलेली माहिती भरुन नोंदणी पूर्ण करा. नोंदणीनंतर आपल्या यूजर आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करुन उमेदवार आपला अर्ज सबमिट करु शकतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3huJCFs
via nmkadda

0 Response to "MDL Recuitment 2021: माझगाव डॉकमध्ये १३८८ पदांची भरती, सरकारी नोकरीसाठी अर्ज करा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel