TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

MPSC Bharti: १५,५११ पदांच्या भरतीला शासनाची मान्यता; एमपीएससीमार्फत होणार प्रक्रिया Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सन २०१८ पासून विविध संवर्गातील भरण्यात येणाऱ्या १५ हजार ५११ पदांच्या भरतीस ( Bharti) राज्य सरकारने मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ही माहिती मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिली. उपमुख्यमंत्री पवार यांनी 'एमपीएससी'चा कारभार गतिमान करताना, 'एमपीएससी' सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलैअखेरपर्यंत भरण्यात येणार असल्याचे सोमवारी सांगितले होते. मंगळवारी विधानसभेत केलेल्या निवेदनात पवार यांनी 'एमपीएससी'मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल जलद गतीने पूर्ण करण्यासाठी उपाययोजनांबाबतचे ठोस निर्णय राज्य सरकारमार्फत घेण्यात आले असल्याचे सांगितले. ज्या विभागांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे अशा विभागांना रिक्त पदे भरण्याची मान्यता वित्त विभागाने दिली आहे. त्यामुळे आता सन २०१८पासून 'एमपीएससी'मार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार तीन संवर्गातील १५,५११ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आरक्षण तपासून कार्यवाही 'एमपीएससी'ने ही रिक्त पदे भरताना पदांचे आरक्षण तपासून, ती पदे भरण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही अजित पवार यांनी आपल्या निवेदनात सांगितले. गटनिहाय भरती गट अ - ४,४१७ गट ब - ८,०३१ गट क - ३,०६३ एकूण - १५,५११


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ADiNHM
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या