Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३० जुलै, २०२१, जुलै ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-07-30T14:43:43Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MU Idol Result 2021: आयडॉलच्या बीकॉम परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
Idol 2021: मुंबई विद्यापीठाच्या () दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (Idol)उन्हाळी सत्राच्या वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्ष बीकॉम या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेचा निकाल ९४.१९ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. जुलै २०२१ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या या परीक्षेत एकूण ४ हजार १८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम श्रेणीत २२६०, द्वितीय श्रेणीत १४५४ व ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ५ हजार ७९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेत ५ हजार ७९१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेला एकही विद्यार्थी अनुपस्थित नव्हता. तर या परीक्षेत २५८ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2eryysJ वर निकाल पाहू शकतात. विद्यापीठाने आजपर्यंत उन्हाळी सत्राचे १०७ निकाल जाहीर केले आहेत. आज विद्यापीठाने बीई (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग ) सत्र ७ आणि ८, बीई (सिव्हिल इंजिनिअरिंग ) सत्र ८, तृतीय वर्ष बीए (आयडॉल) व तृतीय वर्ष बीकॉम (आयडॉल) असे ५ निकाल जाहीर केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zUUT9w
via nmkadda