Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २ जुलै, २०२१, जुलै ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-07-02T12:47:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET 2021 साठी अर्ज लवकरच; CSV ;च्या माध्यमातूनही भरता येईल अर्ज Rojgar News

Advertisement
Update:मेडिकल यूजी प्रवेश परीक्षा नीट २०२१ साठी अर्ज करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA)नीटचा अॅप्लिकेशन फॉर्म ऑफिशियल वेबसाइट ntaneet.nic.in वर जारी केला जाईल. एनटीए नीट (NTA NEET) वरच ऑनलाइन रजिस्ट्रेशनची लिंक देखील अॅक्टिव्ह केली जाईल. नीटसाठी अर्ज करण्याआधी विद्यार्थ्यांकडे कॉमन सर्विस सेंटर (Common Service Centre) च्या मदतीसाठी अप्लाय करण्याचाही पर्याय असेल. एनटीएनेच ही माहिती दिली आहे. विद्यार्थी स्वत: नीटच्या वेबसाइट वर जाऊन या मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी ( 2021) करू शकतात आणि अॅप्लिकेशन फॉर्म (NEET application form 2021) भरू शकतात. किंवा मग कॉमन सर्विस सेंटर द्वारे नीट यूजी 2021 साठी अप्लाय करू शकतात. कॉमन सर्विस सेंटर काय आहे? केंद्र सरकारने ही सुविधा दिली आहे. डिजिटल इंडिया इनीशिएटिव (Digital India Initiative) अंतर्गत ही सुविधा सुरू झाली. ज्या लोकांना ऑनलाइन प्रक्रियेत अडचण येते, त्यांच्यासाठी ही सोय आहे. एनटीएच्या वेबसाइट वर जारी सूचनेनुसार, ज्या विद्यार्थ्यांना नीट 2021 साठी अप्लाय करण्यात अडचण येत असेल, त्यांनी जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC)वर जाऊन अर्ज भरायचा आहे. NEET application 2021: कशी मिळणार सीएससीची मदत भारत सरकारची सीएससी योजना नॅशनल ई-गव्हर्न्सन्स प्लानचा भाग आहे. प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर हर ग्राम पंचायत स्तर पर कॉमन सर्विस सेंटर चालवले जाते. यासाठी विलेज लेवल एंटरप्रेन्योर (VLE) असतो. तुमच्या घराशेजारील सीएससी कुठे आहे त्याची माहिती तुम्ही csc.gov.in वर जाऊन करू शकता. मागील वर्षी देशभरात सुमारे २.५ लाख कॉमन सर्विस सेंटर्स सुरू केले गेले. आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरचा माहिती घ्या आणि तेथे जा. तेथे कार्यालयीन वेळेत विलेज लेवल एंटरप्रेन्योरला भेटा आणि सांगा की तुम्हाला नीट 2021 का फॉर्म (NEET 2021 form) भरायचा आहे. फॉर्ममध्ये भरायची सर्व माहिती व्हीएलईला सांगात. तुमच्यासाठी ते अर्ज भरतील. नीट अॅप्लिकेशन फी भरा. फी भरताना अडचण येत असेल तर ते कामही व्हीएलईमार्फत करू शकता. नीट 2021 अॅप्लिकेशन फॉर्मसंबंधी आतापर्यंत शिक्षण मंत्रालयाने एनटीएला कोणतीही सूचना दिलेली नाही. परीक्षेची तारीख तूर्त १ ऑगस्ट आहे. रजिस्ट्रेशन लवकरच सुरू केले जाऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hyXRt8
via nmkadda