Advertisement

Exam Date: केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’यांनी मंगळवारी ६ जुलै रोजी एका ऑनलाइन सोशल मीडिया संवादाद्वारे जेईई मेन 2021 च्या प्रलंबित तिसऱ्या आणि चौथ्या सत्राची परीक्षांसाठी तारखांची घोषणा केली. जेईई प्रमाणे नीट 2021 परीक्षेची सुधारित तारीख आणि नोंदणी सुरू करण्याची देखील विद्यार्थी मागणी करत आहेत. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी ऑनलाइन सोशल मीडिया संवादादरम्यान, नीट यूजी 2021 परीक्षांसंबधी कोणतीही घोषणा केलेली नाही. तूर्त तरी वैद्यकीय परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजीचे आयोजन १ ऑगस्ट २०२१ रोजी केले आहे. फेक नोटीस सोशल मीडिया वर व्हायरल दूसरीकडे, देशभरातील उमेदवारांची नीट २०२१ परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर एक फेक नोटीस सोशल मिडीयावर व्हायरल होत होते. यात असा दावा केला होता कीनीट यूजी परीक्षेचे आयोजन ५ सप्टेंबर रोजी ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. मात्र ही नोटीस पूर्णपणे बनावट आहे आणि एनटीएने अशा प्रकारची कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत वेबसाइट ntaneet.nic.in वर जारी होणाऱ्या परिपत्रकांवरच विश्वास ठेवावा. नीट 2021 रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होण्याची शक्यता एनटीएद्वारे घोषित नीट 2021 परीक्षेची १ ऑगस्ट ही तारीख लक्षात घेऊन असं म्हटलं जात आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीट २०२१ साठी नोंदणी प्रक्रिया देखील लवकरच सुरू करण्याची शक्यता आहे. उमेदवार एनटीए नीट 2021 रजिस्ट्रेशन परीक्षा पोर्टल ntaneet.nic.in वर जाऊन नोंदणी करू शकतील. नीट रजिस्ट्रेशन 2021 च्या संपूर्ण प्रक्रियेचे पाच टप्पे असतात. रजिस्ट्रेशन, अॅप्लिकेशन फॉर्म भरणे, डॉक्युमेंट (फोटोग्राफ, मार्कशीट आणि सर्टिफिकेट) अपलोड करणे, परीक्षा शुल्क भरणे आणि अॅप्लिकेशन सबमिट करणे आणि त्यानंतर त्याचे प्रिंट घेणे अशा टप्प्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3whSJi5
via nmkadda