Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १४ जुलै, २०२१, जुलै १४, २०२१ WIB
Last Updated 2021-07-14T06:47:09Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET 2021 Exam Pattern: एनटीएने बदलला परीक्षा पॅटर्न, नीट यूजी प्रश्नपत्रिकेत मिळणार पर्याय Rojgar News

Advertisement
Exam Pattern: राष्ट्रीय एजन्सी ()ने नीट यूजी परीक्षा २०२१ च्या तारखांची घोषणा केली आहे. नीट यूजी २०२१ ची नोंदणी १३ जुलैला सुरु झाली असून ६ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. उमेदवार नीट परीक्षा पोर्टल ntaneet.nic.in वर जाऊन नीट यूजी परीक्षा २०२१ साठी अर्ज करु शकतात. दुसरीकडे करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षात परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी होतेय. हे पाहता एनटीएने नीट यूजी २०२१ एक्झाम पॅटर्नमध्ये थोडा बदल केला आहे. एनटीएने जाहीर केलेल्या (नीट यूजी)२०२१ माहिती पत्रकामधील टेस्ट पॅटर्ननुसार परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेमध्ये दोन सेक्शन असतील. प्रत्येक विषयासाठी दोन सेक्शन असतील. यामधील सेक्शन ए मध्ये ३५ प्रश्न आणि सेक्शन बी मध्ये १५ प्रश्न असतील. या १५ प्रश्नांमधील कोणतेही १० प्रश्न सोडवण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे सर्व विषयांचे दोन सेक्शन मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पहिल्याप्रमाणे समान राहील. प्रत्येक योग्य प्रश्नाच्या उत्तरासाठी ४ गुण असतील. तर चुकीच्या उत्तराचा एक गुण कापला जाईल. नीट यूजी 2021: परीक्षेचे माध्यम, वेळ आणि भाषा नीट यूजी २०२१ परीक्षेचे आयोजन पेन आणि पेपरच्या माध्यमातून केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना ओएमआर शीटवर आपले उत्तर मार्क करावे लागणार आहे. परीक्षेसाठी ३ तासांचा वेळ असेल. परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न इंग्रजी व्यतिरिक्त स्थानिक भाषेमध्ये देखील असतील. ज्यामध्ये हिंदी, मराठी, उडीया, तामिळ, तेलगू, उर्दू, पंजाबी, कन्नड, मल्याळम, बंगाली, आसामी भाषांचा समावेश आहे. जे उमेदवार नीट २०२१ नोंदणी करताना केवळ इंग्रजी भाषेची निवड करतील त्यांना इंग्रजी भाषेची प्रश्नपत्रिका मिळेल. जे उमेदवार इंग्रजीसहित हिंदी किंवा इतर स्थानिक भाषेची निवड करतील त्यांना इंग्रजी व्यतिरिक्त त्या भाषेची प्रश्नपत्रिका देखील दिली जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hyX6RP
via nmkadda