Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १३ जुलै, २०२१, जुलै १३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-13T05:47:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET 2021: अर्ज प्रक्रिया आजपासून होणार सुरू; 'ही' कागदपत्रे ठेवा तयार Rojgar News

Advertisement
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी सायंकाळी राष्ट्रीय स्तरावरील मेडिकल प्रवेश परीक्षा NEET 2021 च्या तारीखेची घोषणा केली. नीट परीक्षा १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. याआधी ही परीक्षा NEET 2021 ऑगस्टमध्ये होणार होती. १ ऑगस्टला नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आली. ज्या उमेदवारांना NEET 2021 परीक्षा द्यायची आहे ते १३ जुलैपासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. मंगळवारी १३ जुलै रोजी अर्ज प्रक्रिया सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरू होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ची वेबसाइट nta.ac.in वर ऑनलाइन अर्जांची लिंक अॅक्टिव करेल. तुम्ही थेट एनटीए नीटच्या वेबसाइट ntaneet.nic.in वर जाऊनही अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरू होईल. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल. नीट अॅप्लिकेशन फॉर्म 2021 (NEET 2021) भरण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, जाणून घ्या. NEET Application 2021: तयार ठेवा ही कागदपत्रे लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटो (साइज 10kb ते 200kb च्या दरम्यान असावी) पोस्ट कार्ड साइज फोटो (साइज 50kb ते 300kb च्या दरम्यान असावी) पांढऱ्या कागदावर हस्ताक्षरातली स्कॅन्ड कॉपी (याची साइज 4kb ते 30kb च्या दरम्यान असावी) डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी (thumb impression)डाव्या शक्य नसेल तर उजव्या हाताचे थंब इंप्रेशन। (याची साइज 10kb ते 50 kb च्या दरम्यान असावी) NEET UG 2021: कसा करायचा अर्ज स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट , ntaneet.nic.in. वर जा. स्टेप २- ' registration' लिंक वर क्लिक करा. स्टेप ३- विचारलेली माहिती भरा. स्टेप ४- शुल्क भरा. स्टेप ५- अर्ज सबमिट करा. स्टेप ६- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचं प्रिंटआउट घेऊन ठेवा. NEET (UG) 2021 च्या माध्यमातून MBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS आणि BHMS अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. अधिकृत नोटिसनुसार, NEET (UG) 2021 हिंदी आणि इंग्रजीसह ११ भाषांमध्ये पेन-पेपर मोडमध्ये म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ySsArQ
via nmkadda