Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २८ जुलै, २०२१, जुलै २८, २०२१ WIB
Last Updated 2021-07-28T08:43:49Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET OBC Reservation: 'नीट'मध्ये ओबीसी आरक्षण देण्याची विविध संघटनांची मागणी Rojgar News

Advertisement
NEET : मागास वर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील व्यक्ती आणि संघटनांनी NEET मध्ये देण्याची मागणी केली आहे. यावेळच्या जनगणनेमध्ये जातिनिहाय आकडेवारी देखील एकत्र केली जावी. यामुळे विविध क्षेत्रातील पात्र समुदायाला आरक्षणाचा योग्य लाभ मिळेल अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. या व्यक्ती आणि संघटनांनी 'सोशल रिवॉल्यूशन अलायंस' (एसआरए) बॅनर अंतर्गत एका संम्मेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी यासंबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मेडिकल प्रवेश परीक्षेमध्ये ओबीसी निश्चित केले जावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त कार्यवाहक मुख्य न्यायाधीश वी ईश्वरैया, इलाहाबाद उच्च न्यायालय माजी न्यायाधीश वीरेंद्र सिंह यादव, दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर अवधेश कुमार साह, ‘वोटर एज्युकेशन फाउंडेशन’ नामक संस्थेचे सदस्य अशोक कुमार सिंह, ओबीसी महासभा (मध्य प्रदेश) चे अध्यक्ष कुशवाह आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. २०२१ ची जनगणना जातिनिहाय नसेल या सरकारच्या निर्णयावर आम्ही नाराज आहोत असे या संमेलनात उपस्थितांनी सांगितले. यावेळच्या जनगणनेला जाती आधारित जनगणनेअंतर्गत घेतले जावे. असे न केल्यास मागास वर्गातील लोकांकडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे ओबीसी महासभाचे अध्यक्ष धर्मेंद्र कुशवाह यांनी म्हटले. नीटच्या परीक्षेमध्ये ओबीसी आरक्षण निश्चित केले जावे. ओबीसी वर्गाच्या कल्याणासाठी केंद्र स्तरावर वेगळे मंत्रालय बनवले जावे आणि केंद्री लोकसेवा आयोगाच्या पातळीवर राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग बनवला जावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. नीट यूजी परीक्षा नोंदणी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA)ने नीट यूजी परीक्षा २०२१ च्या तारखांची घोषणा केली आहे. नीट यूजी २०२१ ची नोंदणी १३ जुलैला सुरु झाली असून ६ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. उमेदवार नीट परीक्षा पोर्टल ntaneet.nic.in वर जाऊन नीट यूजी परीक्षा २०२१ साठी अर्ज करु शकतात. दुसरीकडे करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षात परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी होतेय. हे पाहता एनटीएने नीट यूजी २०२१ एक्झाम पॅटर्नमध्ये थोडा बदल केला आहे. एनटीएने जाहीर केलेल्या (नीट यूजी)२०२१ माहिती पत्रकामधील टेस्ट पॅटर्ननुसार परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेमध्ये दोन सेक्शन असतील. प्रत्येक विषयासाठी दोन सेक्शन असतील. यामधील सेक्शन ए मध्ये ३५ प्रश्न आणि सेक्शन बी मध्ये १५ प्रश्न असतील. या १५ प्रश्नांमधील कोणतेही १० प्रश्न सोडवण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे सर्व विषयांचे दोन सेक्शन मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पहिल्याप्रमाणे समान राहील. प्रत्येक योग्य प्रश्नाच्या उत्तरासाठी ४ गुण असतील. तर चुकीच्या उत्तराचा एक गुण कापला जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BStyXI
via nmkadda