NEET PG 2021: नीट पीजी, एमडीएससहीत विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर Rojgar News

NEET PG 2021: नीट पीजी, एमडीएससहीत विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर Rojgar News

2021: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेश (NBE) ने पीजी, , डीएनबी-पीडीसीईटी सहित अनेक मेडिकल परीक्षांचे शेड्यूल्ड जाहीर करण्यात आले आहे. अधिकृत वेबसाइट विविध परीक्षांनुसार तारखांची यादी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेस बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जाऊन वेळापत्रक तपासू शकतात. वेबसाइटवर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, जून २०२१ सत्रासाठी डीएनबी/डीआरएनबी फायनल थेअरी परीक्षेचे आयोजन २४ ते २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत होणार आहे. तर परीक्षा २०२१ चे आयोजन ११ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. डीएनबी-पीडीसीईटी परीक्षा २०२१ १९ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. याशिवाय नीट एसएस २०२१ परीक्षा १३ आणि १४ नोव्हेंबर २०२१ ला होणार आहे. नीट एमडीएस २०२२ चे आयोजन १९ डिसेंबर २०२१ करण्यात आले आहे. एफईटी, एफएमजीई या परीक्षांच्या तारखा अधिकृत वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत. या तपासण्यासाठी वेबसाइटवर नोटीस सेक्शनमध्ये जाऊन आगामी एनबीईएमएस परीक्षांच्या वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करायला हवे. मेडिकलच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी (Medical PG admission) घेतली जाणारी प्रवेश परीक्षा नीट पीजी (NEET PG)च्या तारखेची घोषणा याआधी करण्यात आली होती. नीट पीजी परीक्षा २०२१ ()चे आयोजन ११ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री (Health Minister) मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांनी परीक्षेच्या तारखेची घोषणा केली. वेबसाइटवर याआधी या परीक्षेची २३ जुलै ही तारीख दाखविण्यात येत होती. पण आता ती अपडेट करण्यात आली होती. नीट यूजी परीक्षा १२ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. यासाठी १३ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. देशभरातील परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन NEET UG 2021 परीक्षा होणार आहे. तसेच परीक्षेसाठी शहरांची संख्या देखील वाढविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याआधीच्या निर्णयानुसार १५५ शहरांमध्ये ही परीक्षा होणार होती. पण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १९८ शहरांमध्ये परीक्षा होणार आहे. शहरांसोबत परीक्षा केंद्रांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. २०२० मध्ये ३८६२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3y5zw4Z
via nmkadda

0 Response to "NEET PG 2021: नीट पीजी, एमडीएससहीत विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel