Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ८ जुलै, २०२१, जुलै ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-07-08T07:47:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET UG 2021 परीक्षा लांबणीवर पडणार? एनटीएची महत्त्वाची माहिती Rojgar News

Advertisement
NEET 2021 Exam Date: मेडिकल प्रवेश परीक्षा एनटीए नीट (यूजी) २०२१ परीक्षेची तारीख कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे लांबणीवर पडावी, या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी २०२१ परीक्षेसंदर्भात बुधवारी ७ जुलै २०२१ रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. यात असे म्हटले आहे की कोविड - १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर नीट यूजी परीक्षेच्या तारखेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी चर्चा केली जात आहे. असं म्हटलं जात आहे की यानंतर लवकरच नीट यूजी २०२१ परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. एनटीएने यापूर्वी १२ मार्च २०२१ रोजी नीट यूजी प्रवेश परीक्षा 2021 च्या आयोजनाच्या तारखेसंदर्भातील घोषणा केली होती. यानुसार, ही परीक्षा १ ऑगस्ट २०२१ रोजी पेन-पेपर म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. मात्र, देशभरातून विद्यार्थी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका लक्षात घेऊन ही परीक्षा लांबणीवर टाकावी असे विद्यार्थी पालकांचे म्हणणे आहे. फेक नोटीसपासून सावध रहा दरम्यान, ही ऑगस्टऐवजी सप्टेंबरमध्ये होणार असल्याची एक बनावट नोटीस नुकतीच व्हायरल झाली होती. यात असा दावा केला होता की नीट यूजी परीक्षेचे आयोजन ५ सप्टेंबर रोजी ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. मात्र ही नोटीस पूर्णपणे बनावट आहे आणि एनटीएने अशा प्रकारची कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत वेबसाइट ntaneet.nic.in वर जारी होणाऱ्या परिपत्रकांवरच विश्वास ठेवावा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36n5i12
via nmkadda