Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १२ जुलै, २०२१, जुलै १२, २०२१ WIB
Last Updated 2021-07-12T08:47:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET UG 2021 परीक्षा लांबणीवर पडणार का? जाणून घ्या अपडेट... Rojgar News

Advertisement
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी प्रवेश परीक्षा लांबणीवर पडणार का की नियोजित वेळापत्रकानुसार होणार, याबाबत तूर्त अनिश्चितता आहे. मात्र, करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेची स्थिती आणि तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता या पार्श्वभूमीवर नीट यूजी २०२१ परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माध्यमातील वृत्तांनुसार नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) UG 2021 स्थगित करण्याची योजना आखत आहे. मिडीया रिपोर्ट्सनुसार, लवकरच मेडिकल प्रवेश परीक्षेच्या सुधारित तारखांसंदर्भातील नोटिफिकेशन जाहीर करेल. असेही म्हटले जात आहे की नीट 2021 परीक्षा ऑगस्टऐवजी सप्टेंबर मध्ये आयोजित केली जाईल. NEET-UG 2021 परीक्षा तूर्त १ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. NTA द्वारे, अद्याप UG परीक्षा स्थगित करण्यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की अधिक माहितीसाठी त्यांनी अधिकृत वेबसाइट ntaneet.nic.in ला भेट देत राहावी. जेव्हापासून CBSE बारावीच्या बोर्ड परीक्षा 2021 रद्द करण्यात आल्या आहेत, तेव्हापासून विद्यार्थी करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर NEET-UG 2021 स्थगित करण्याची मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की सद्यस्थितीत ऑफलाइन परीक्षा आयोजित करणे अयोग्य होईल. अनेक विद्यार्थ्यांनी अशीही मागणी केली आहे की या वर्षी दोन ते तीन वेळा नीट परीक्षेचे आयोजन केले जावे. मात्र ही परीक्षा एकदाच आयोजित केली जाणार आहे, असं एनटीएने स्पष्ट केलं आहे. NEET परीक्षा मागील वर्षी कोविड -१९ महामारी आणि लॉकडाऊनमुळे परीक्षा स्थगित करण्यात आली होती. अनेकदा लांबणीवर पडल्यानंतर अखेर सप्टेंबर २०२० मध्ये नीट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आयोजित केली गेली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36JvnrD
via nmkadda