NIOS बोर्डाच्या दहावी, बारावीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर परीक्षांसाठी नोंदणी सुरू Rojgar News

NIOS बोर्डाच्या दहावी, बारावीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर परीक्षांसाठी नोंदणी सुरू Rojgar News

October-November Public Exam 2021: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) द्वारे इयत्ता दहावी आणि बारावीच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२१ महिन्यांमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जे विद्यार्थी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षा देऊ इच्छितात, ते संस्थेची अधिकृत वेबसाइट, nios.ac.in वर उपलब्ध करण्यात आलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्मच्या माध्यमातून नोंदणी करू शकतात. एनआयओएस द्वारे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षेसाठी नोंदणीची अखेरची मुदत १६ ऑगस्ट २०२१ आहे. एनआईओएस द्वारे सोमवारी २६ जुलै २०२१ रोजी सोशल मीडिया वर ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ च्या परीक्षेच्या बाबतीत जारी केलेले अपडेट आणि नोटीसनुसार, सर्व प्रादेशिक संचालकांना संबंधित एआयना परीक्षांसाठी दिलेल्या वेळेत केवळ ऑनलाइन माध्यमातून परीक्षा शुल्क जमा करण्यासाठी सूचित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही केंद्राद्वारे ऑफलाइन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी उमेदवार एनआयओएसची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात. वेळापत्रक अद्याप नाही एनआयओएसने कक्षा परीक्षांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षेंतर्गत विविध विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. संस्थेद्वारे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ परीक्षेचे वेळापत्रक नंतर अधिकृत वेबसाइटवर जारी केले जाईल. संस्थेने तूर्त जारी केलेल्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत - विना विलंब शुल्कासाठी रजिस्ट्रेशन सुरू होण्याची तारीख – २७ जुलै २०२१ विना विलंब शुल्कासाठी रजिस्ट्रेशनची अखेरची मुदत – १६ ऑगस्ट २०२१ विलंब शुल्कासह रजिस्ट्रेशनचा कालावधी – १७ ते २६ ऑगस्ट २०२१ रुपये १५०० प्रति विद्यार्थी विलंब शुल्कासह अर्ज करण्याचा कालावधी –२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zECM7N
via nmkadda

0 Response to "NIOS बोर्डाच्या दहावी, बारावीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर परीक्षांसाठी नोंदणी सुरू Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel