NPCIL Recruitment 2021: दहावी पास असणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

NPCIL Recruitment 2021: दहावी पास असणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Recruitment 2021: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने क्लरिकल असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंटच्या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार एनपीसीआयएलची अधिकृत वेबसाइट www.npcil.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Government Jobs)च्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अर्ज करण्याची चांगली संधी आहे. या नोकरीसाठी ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करता येऊ शकतात. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. एनपीसीआयएल भरती २०२१ चीअधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. बातमीखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन संपूर्ण नोटिफिकेशन वाचू शकता. नोकरीचा तपशिल (NPCIL 2021 Details) ऑफिस असिस्टंट: १० पद क्लरिकल असिस्टंट: ०६ पद एकूण रिक्त पदांची संख्या - १६ पद कोण करु शकेल अर्ज ? ऑफिस असिस्टंट: या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक (इयत्ता दहावी) परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. क्लरिकल असिस्टंट: या पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि कॉम्प्युटरचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा या पदासाठी उमेदवाराचे वय ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत १८ वर्ष पूर्ण असावे आणि ४७ वर्षांपेक्षा अधिक नसावे. किती मिळेल पगार? सर्व पात्र दोन्ही पदांच्या उमेदवारांना वेगवेगळा पगार असेल. क्लरिकल असिस्टंट पोस्टवर नियुक्त झालेल्या उमेदवारांना २८ हजार १०० रुपये पगार मिळेल तर ऑफिस सहायक पदासाठी पात्र उमेदवाराला १९ हजार ५०० दरमहा पगार मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BC6tYP
via nmkadda

0 Response to "NPCIL Recruitment 2021: दहावी पास असणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel