Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १३ जुलै, २०२१, जुलै १३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-13T11:47:45Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NTA LNIPE 2021च्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु Rojgar News

Advertisement
LNIPE 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA)तर्फे लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन (LNIPE 2021) च्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट lnipe.nta.ac.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२१ आहे. एनटीएतर्फे उमेदवारांना १ ऑगस्ट ते ३ ऑगस्टपर्यंत त्यांच्या अर्ज फॉर्ममध्ये बदल / दुरुस्ती करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एलएनआयपीई प्रवेश परीक्षेसाठी अर्ज शुल्काबद्दल माहिती देण्यात आली आहे. उमेदवार अर्ज करत असलेल्या प्रत्येक प्रोग्रामसाठी १,५०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. परीक्षा १४ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र ९ ऑगस्ट रोजी जाहीर केले जाणार आहे. सर्व कोर्सच्या परीक्षेसाठी ६० मिनिटाचा वेळ दिला जाईल. केवळ एमपीएच कोर्ससाठी ९० मिनिटांचा वेळ असेल. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तराला निगेटीव्ह मार्किंग असणार आहे. LNIPE 2021: असा करा अर्ज LNIPE NTA ची अधिकृत वेबसाईट lnipe.nta.ac.in ला भेट द्या आपला मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीच्या मदतीने ‘ऑनलाइन नोंदणी’ करा. आपला अर्ज क्रमांक लक्षात ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा. ऑनलाईन अर्जातील सर्व तपशील भरा स्कॅन केलेली फोटो आणि सही अपलोड करा जन्माचा पुरावा, दहावी प्रमाणपत्र, बारावी प्रमाणपत्र (रिझल्ट लागला असल्यास), पदवी गुणपत्रक (पीजी अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी, आणि निकाल जाहीर झाला असेल तरच) ही स्कॅन केलेली कागदपत्र अपलोड करा. सर्वोत्कृष्ट क्रीडा कामगिरीची ३ प्रमाणपत्रे (बीपीईडी आणि पीजी डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंगसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी) जोडा ऑनलाइन माध्यमातून फी भरा. भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या. लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशनतर्फे घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा विविध डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर आणि पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. ग्वाल्हेर आणि गुवाहाटी येथे संस्थेचे कॅम्पस आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yRH7Ed
via nmkadda