TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Oil Indiaमध्ये १२० पदांची भरती, १५ ऑगस्टपर्यंत करा अर्ज Rojgar News

Recruitment 2021: ऑईल इंडिया लिमिटेड (OIL)मध्ये ज्युनियर असिस्टंट पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत एकूण १२० पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. या पदावर अर्ज करणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑईल इंडियाची वेबसाईट https:// www.oil-india.com/ वर जाऊन नोटिफिकेशन वाचून अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रिया गुरुवारी १ जुलैपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट आहे. ज्युनिअर असिस्टंट पदावर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सुरुवातीला अधिकृत वेबसाईट https: // www.oil-india.com/ वर जावे लागेल. यानंतर ज्युनिअर असिस्टंट पदाच्या भरतीच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर स्क्रीनवर नवे पेजे खुले होईल. आता स्वत:ची नोंदणी करा आणि सर्व आवश्यक तपशिल भरा. यानंतर ईमेल आयडी आणि पासवर्डवर मिळालेला ओटीपी एंटर करा. अर्ज पत्र भरा आणि सर्व कागदपत्र अपलोड करा. अर्ज शुल्क भरा. भविष्यात उपयोगासाठी हॉर्ड कॉपी स्वत:कडे ठेवा. ऑईल इंडिया लिमिटेडने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार ज्युनिअर असिस्टंट्सच्या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातील पदवी असणे गरजेचे आहे. कोणत्याही शाखेत ४० टक्के १० +२ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे किमान ६ महिने कालावधीचा कॉम्प्युटर डिप्लोमा सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त एमएस वर्ड, एमएस एक्सेल, एमएस पॉवर पॉईंटचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तर सामान्य वर्गातील उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांच्या आत असायला हवे. याशिवाय आरक्षित वर्गासाठी उमेदवारांना सरकारी नियमाप्रमाणे सवलत दिली जाणार आहे. वयोमर्यादा ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान असावे. ओबीसी (नॉन क्रिमीलेयर) साठी वय १८ ते ३३ वर्षांच्या आत असणे गरजेचे आहे. शुल्क या पदावर अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी वर्गातील उमेदवारासाठी २०० रुपयांचे शुल्क आकारले जाईल. तर अनुसूचित जाती/जमाती/ईडब्ल्यूएस/दिव्यांग/माजी सैनिकांना अर्जामध्ये सवलत देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ttg3fr
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या