Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १५ जुलै, २०२१, जुलै १५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-15T10:47:21Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

RBI Grade B Recruitment 2021: आरबीआयतर्फे 'या' पदांच्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर Rojgar News

Advertisement
Grade B : रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India, RBI)ने विविध पदांच्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. याची मुलाखत प्रक्रिया २ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत चालणार आहे. यानुसार ग्रेड बी डीआर जनरल पदासाठी मुलाखत २ ऑगस्टला होणार आहे. तसेच ग्रेड बी डीआर DEPR-DSIM पदासाठी ३० ऑगस्टला मुलाखत आयोजित केली जाणार आहे. अशावेळी लेखी परीक्षेत निवड झालेले उमेदवार अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जाऊन मुलाखतीचे वेळापत्रक पाहू शकता. देशभरातील करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर यावेळेस या पदांची संपूर्ण मुलाखत प्रक्रिया व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. तसेच उमेदरांकडे मुलाखतीसाठी चांगले इंटरनेट कनेक्शन आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म असणे आवश्यक असल्याचे आरबीआयतर्फे सांगण्यात आले. आरबीआयकडून उमेदवारांना मुलाखतीसंदर्भातील पत्र किंवा ईमेल २० जुलैपर्यंत पाठवण्यात येणार आहे. फेरीसाठी पात्र झाल्यानंतरही उमेदवाराला ते मिळाले नसेल तर त्यांनी आरबीआयला त्वरित यासंदर्भातील माहिती कळविणे गरजेचे आहे. यासंदर्भातील माहिती तुम्ही Rbisb@rbi.org वर ईमेल करु शकता. मुलाखतीच्या दिवशी आवश्यक ती सर्व कागदपत्रे असतील याची खात्री उमेदवारांना करुन घ्यावी लागणार आहे. मुलाखती दरम्यान उमेदवारांना अॅफेडेव्हिटसह सर्व मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रांसह योग्यरित्या भरलेले बायोडाटा दाखवावा लागणार आहे. मूळ स्वरुपातील सर्व कागदपत्र उमेदवारांकडे विचारली जातील. उमेदवाराकडे सर्व कागदपत्रांची सेल्फ अटेस्टेड कॉपी असणे गरजेचे आहे. ग्रेड बी परीक्षेबद्दल रिझर्व्ह बँक ग्रेड बी परीक्षा २०२१ ची लेखी परीक्षा मार्च महिन्यात झाली होती. याचा पेपर १ हा ६ मार्च रोजी घेण्यात आला. तर पेपेर २ आणि ३ हे ३१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आले. ही परीक्षा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या भरतीतील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी अशा तीन टप्प्यात ही परीक्षा घेण्यात येते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yZZirn
via nmkadda