Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १० जुलै, २०२१, जुलै १०, २०२१ WIB
Last Updated 2021-07-10T05:47:06Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबई विद्यापीठाचे पदवी परीक्षांचे निकाल रखडले; विद्यार्थी चिंतेत Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा पूर्ण होऊन दीड महिना उलटूनही अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. यामुळे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या तसेच परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. मात्र पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी परीक्षा विभागही हतबल असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा यंदाही कॉलेजस्तरावर घेण्यात आल्या होत्या. या सर्व परीक्षांचे नियोजन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आले होते. मे महिन्याच्या २० तारखेला सर्व महत्त्वाच्या शाखांच्या पदवी परीक्षा पूर्ण झाल्या. मात्र आता या परीक्षा संपून दोन महिने होत आले, तरी निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. यातच राज्यातील इतर विद्यापीठांच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. तर काही विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी गुणपत्रिकांची आवश्यकता आहे. मात्र अद्याप निकाल जाहीर न झाल्याने या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे विद्यापीठाने लवकरात लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधींकडून होत आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेजांकडे चौकशी केली असता कॉलेजांनी परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासून दिलेले सर्व गुण विद्यापीठाला कळविल्याचे सांगितले आहे. आता पुढील सर्व कार्यवाही विद्यापीठात होऊन विद्यापीठातून अंतिम निकाल जाहीर होईल, असे कॉलेजे सांगत आहेत. याबाबत विद्यापीठाकडे विचारणा केली असता, सध्या कर्मचारी संख्या कमी असल्याने निकाल प्रक्रियेचे काम धीम्या गतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले. सध्या करोनाच्या नियमांमुळे ५० टक्के उपस्थितीचा नियम विद्यापीठात लागू आहे. यामुळे निम्मे कर्मचारी विभागात काम करत आहेत. यातच काही कर्मचारी हे बदलापूर, विरार, वसई अशा भागातून येणारे आहेत. त्यांना लोकल प्रवासाची मुभा नसल्याने अनेक कर्मचारी वेळेत पोहोचू शकत नाहीत. यामुळे निकालाच्या कामावर परिणाम झाल्याचे समजते. विद्यापीठाने परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारला पाठवले आहे. मात्र हा विभाग अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने लोकल प्रवासाची मुभा देता येणार नसल्याचे सरकारकडून कळविण्यात आले. याचबरोबर या सर्वांना बस अथवा अन्य मार्गाने प्रवास करण्यास सूचित करावे, असेही सरकारतर्फे कळविण्यात आले आहे. पहिल्या लॉकडाउनच्या काळात विद्यापीठाने कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी बसची सुविधा केली होती; मात्र प्रवासाला लागणारा वेळ हा खूप जास्त होत असल्याने कर्मचारी नाराज झाले होते. कारणे काय.... १. विद्यापीठाकडे सध्या मनुष्यबळाची कमतरता. २. काही कॉलेजांकडून निकाल उपलब्ध नाहीत. ३. लोकलबंदीमुळे कर्मचारी वेळेत येण्यात अडचण. परिणाम कोणते... १. पदव्युत्तर पदवीचे प्रवेश सुरू झाल्याने कोंडी. २. इतर राज्यांत प्रवेशासाठी गुणपत्रिका हाती नाहीत. ३. शिक्षणासाठी परदेशी जाणारे विद्यार्थी अडकले. पदवी परीक्षांच्या निकालाचे काम सुरू आहे. पाचव्या सत्राच्या बॅकलॉगचे काही निकाल जाहीर झाले आहेत. सहाव्या सत्राचे निकाल कॉलेजकडून उपलब्ध झाले आहेत. काही कॉलेजांकडून ते काम पूर्ण करून घेतले जात आहे. मनुष्यबळाची उणीव जाणवत असल्याने कामाला नेहमीपेक्षा अधिक वेळ लागत आहे. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्यास मुभा द्यावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. - डॉ. विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3k2KnbH
via nmkadda