Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २ जुलै, २०२१, जुलै ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-07-02T09:47:30Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

सेतू अभ्यासक्रमाबाबत संभ्रम; विद्यार्थ्यांकडे गेल्या वर्षीच्या इयत्तेची पुस्तकंच नाहीत Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळांनी अनेक विद्यार्थ्यांची जुन्या इयत्तेची पुस्तके जमा केली असली, तरी सेतू अभ्यासक्रमाच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची उजळणी होण्यासाठी हीच पुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दिले. त्यामुळे शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या सेतू अभ्यासक्रमाच्या उपक्रमाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दर वर्षी मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. अनेक विद्यार्थी पुस्तके जपून हाताळत असल्याने ही पुस्तके सुस्थितीत असतात. अशा पुस्तकांचे संकलन केल्यास त्यांचा पुनर्वापर होऊ शकतो; तसेच त्यांचे विद्यार्थ्यांना फेरवाटप करता येईल. त्यामुळे कागदाच्या बचतीसह राज्य सरकारचा दोनशे कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने यंदापासून या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याबाबत पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय डिसेंबर महिन्यात घेतला आहे. त्यानुसार २०१९-२० किंवा २०२०-२१ या दोन शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांची पुस्तके शाळास्तरावर जमा करण्याची कार्यवाही करण्यात आली. यामध्ये अनेक शाळांनी पुस्तके जमा केली. मात्र, करोना परिस्थितीमुळे गेल्या शैक्षणिक वर्षात शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाले. अशा परिस्थितीत गेल्या इयत्तेची विद्यार्थ्यांना उजळणी करता यावी; तसेच अवघड पाठ्यक्रम समजण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सेतू अभ्यासक्रमाचा उपक्रम गुरुवार एक जुलैपासून राबविण्याचा निर्णय झाला. मात्र, विद्यार्थ्यांकडे गेल्या वर्षीच्या इयत्तेची पुस्तकेच नसल्याने सेतू अभ्यासक्रमाच्या उपक्रमावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत शिक्षक, अधिकारी आणि पालकांनी तक्रारी मांडल्या. त्यानंतर सेतू अभ्यासक्रमाची पूर्तता करण्यासाठी जुनी पाठ्यपुस्तके आवश्यक आहेत. त्यामुळे ती विद्यार्थ्यांनी शाळेत जमा करू नये, असे आदेश वर्षा गायकवाड यांनी दिले. मात्र, सरकारी शाळांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पुस्तके जमा केली आहेत. आता ही पुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांना परत करावे लागणार आहेत. त्यामुळे शिक्षक आणि मुख्यध्यापकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यातच नवी पुस्तके अद्याप विद्यार्थ्यांपर्यत पोहोचली नसल्याने सेतू अभ्यासक्रमाच्या उपक्रमाला तडा बसला आहे. शिक्षक-मुख्याध्यापकांमध्ये गोंधळ शालेय शिक्षण विभागाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या आदेशानुसार आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके जमा करणे सुरू आहे. शिक्षण विभागाकडून दररोज त्याचा आढावाही घेतला जात आहे. अनेक शाळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक पुस्तके जमा झाली आहेत. ही प्रक्रिया झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके जमा न करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. या दोन्ही परस्पर विरोधी निर्णयामुळे शाळास्तरावर गोंधळ सुरू असून, शिक्षक-मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांकडून जमा केलेली पाठ्यपुस्तके पुन्हा त्याच विद्यार्थ्यांना वितरित करावी लागणार आहेत. त्याची जबाबदारी पुन्हा शिक्षकांना देण्यात येईल. असे निर्णय घेताना शिक्षक, मुध्याध्यापक, शिक्षणाधिकारी अशा कोणाचेही मत विचारात घेतले जात नाही. त्यामुळे या निर्णय़ामुळे शिक्षकांनाच त्रास होत असून, त्याबाबत कोणीही विचार करीत नाही. - विजय कोंबे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Ai3lkm
via nmkadda