Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २६ जुलै, २०२१, जुलै २६, २०२१ WIB
Last Updated 2021-07-26T05:43:20Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

अकरावी सीईटीची तयारी करताय? तर मग या टिप्स तुम्हाला नक्की फायद्याच्या ठरतील Rojgar News

Advertisement
सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर वेदांगला दहावीत ९७.५% टक्के मार्क मिळून उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करायचा सोडून, पुढच्या परीक्षेची तयारी सुरू करावी लागत आहे. म्हणून तो थोडा हिरमुसलेला आहे. अशी परिस्थिती अनेकांची आहे. बोर्डाची परीक्षा नसल्याचा आनंद होताच. पण आता अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) द्यावी लागणार, ह्या विचाराने ते नाराज झाले आहेत. मनासारखे मार्क मिळूनदेखील प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे याचा ताण आणि त्रास अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. आणि परीक्षा म्हटले की तयारी ही लागणारच. जे वेगळ्या बोर्डातले आहेत, त्यांना एसएससी बोर्डचा अभ्यासदेखील करावा लागणार आहे, हा त्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दहावीचा ताण पूर्णपणे संपलेला, उत्तीर्ण झाल्याचा आनंद, आवडत्या कोर्ससाठी प्रवेश, कॉलेजला जाण्याचा उत्साह ह्या सगळ्यामध्ये प्रतीक्षेची तयारी करणं अवघड जाऊ शकते. सीईटीचा सामना करण्यासाठी आपल्यास मदत करण्यासाठी येथे काही टिप्स देत आहे. * अभ्यासाचे फक्त चार विषय आहेत - गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी - हे जाणून घ्या आणि तशी तयारी सुरू करा. * (वेगळ्या बोर्डाचे असल्यास) सामान्य विषय आणि धडे शोधा आणि त्यानुसार तयारी करा. * क्वेश्चन बँकचा वापर करा आणि त्यात दिलेल्या एम्सस्क्यू सोडवा. * वेळापत्रक तयार करा. * स्वतःचे विश्लेषण करा. स्वत:चे सामर्थ्य आणि सोपे / वेळ घेणारे विषय समजून घ्या. * जरी आधी विषय वाचले आणि समजले असतील तर उजळणी करा. * नवीन संकल्पना अस्पष्ट असल्यास, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. * जरी आपल्याला ती पुनरावृत्ती वाटत असेल तरी, परीक्षेसाठी लक्ष केंद्रित करण्याचा आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. * तुम्ही ऑनलाइन उपलब्ध अभ्यासाच्या साहित्याचा संदर्भ घेऊ शकता. * परीक्षेचा पॅटर्न नीट समजून घ्या. * स्वतःच्या तयारीबद्दल अतिआत्मविश्वास बाळगू नका. * चांगले मार्क मिळाले म्हणून सीईटीच्या तयारीकडे दुर्लक्ष करू नका * अभ्यासासाठी विशिष्ट तास वेळ द्या. छोटे ब्रेक घ्या आणि नंतर आपली तयारी पुन्हा सुरू करा. * परीक्षेची पद्धत किंवा मार्किंग सिस्टिमबद्दल कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. योग्य अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती घ्या. निकालाच्या आनंदात वाहवत जाऊ नका, मनावर थोडा संयम ठेवून परीक्षेची तयारी करा. तुमच्याकडे अद्याप वेळ असल्याने परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी होऊ शकते, हे लक्षात असू दे. प्रथमच सीईटी आयोजित केले जात आहे. म्हणून चिंताग्रस्त आणि गोंधळलेले असणे साहजिक आहे. परंतु यामुळे आपल्या तयारीवर परिणाम होऊ देऊ नका. जरी तुम्ही एक विशिष्ट कोर्स / करिअर घ्यायचे ठरवले असले तरीही, प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे, हे विसरू नका. जरी तुम्हाला अभ्यासाची पुनरावृत्ती करण्यास कंटाळा आला असला, तरीही विसरू नका की या परीक्षेतील कामगिरी तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याची शक्यता वाढविण्यास मदत करेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WfOG9L
via nmkadda