TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत विविध पदांची भरती, असा करा अर्ज Rojgar News

Yavatmal bank Recruitment2021: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे बॅंकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यासाठी उमेदवारांसाठी पात्रता आणि निकष जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करता येईल. या भरतीअंतर्गत आरक्षित पदं भरली जाणार आहेत. आरक्षित पदांचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे. एकूण ४२ जागांमध्ये लिपिक आणि सहायक कर्मचारी (शिपाई) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या रिक्त पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार बदलणार आहे. याची सविस्तर माहिती मूळ जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. बातमीखाली जाऊन ही जाहिरात वाचता येणार आहे. यवतमाळ यांच्या आस्थापना विभागामध्ये विविध पदाच्या एकूण ४२ जागा भरण्यात येणार आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,इतर मागास वर्ग या प्रवर्गातील लिपिक आणि सहायक कर्मचारी(शिपाई) पद भरले जाणार आहे. यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. अर्ज भरताना ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक आणि आधार नंबर अचूक भरणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता कनिष्ठ लिपिक पदाकरीता उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. यामध्ये त्याला ४५ टक्क्यांहून अधिक गुण असायला हवेत. संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. GDC&A, CAIIB यासारख्या परीक्षा पास असल्यास किंवा बॅंकिंग डिप्लोमा असलेल्या उमेदवारास नोकरीत प्राधान्य देण्यात येईल. सहायक कर्मचारी (शिपाई) पदाकरीता उमेदवार दहावी पास असणे गरजेचे आहे. पगार कनिष्ठ लिपीक पदासाठी १७ हजार ते १८ हजार पर्यंत पगार मिळेल. तर सहायक कर्मचारी (शिपाई) पदासाठी १४ हजार ते १५ हजार पर्यंत पगार मिळेल. अर्ज भरण्याची तारीख या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ६ जुलैला सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२१ पर्यंत आहे. १८ जुलैला रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. २० जुलै संध्याकाळी ५.३० पर्यंत परीक्षा शुल्क भरता येणार आहे. परीक्षा शुल्क यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेमध्ये चलनाद्वारे भरावे लागणार आहे. या भरती संदर्भातील अद्यवत माहिती बॅंकेच्या बेवसाइटवर वेळोवेळी जाहीर करण्यात येणार आहे. ही माहिती तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल. यासाठी www.ydcc.in आणि बॅंकेच्या www.ydccbank.org वर अर्ज मागविण्यात येत आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AG0qSC
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या