Advertisement

म.टा.प्रतिनिधी, नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने विविध विद्याशाखांमध्ये पारितोषिके पटकावणार्या एकूण १०७ विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. ९ जुलैला मुख्य दीक्षांत समारंभ पार पडल्यानंतर पारितोषिक वितरणासाठी स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दोन भागांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. तुळशीदास गेडाम आणि डॉ. रत्नाकर भेलकर यांना मानवविज्ञान पंडित ही पदवी प्रदान करण्यात आली. सर्वाधिक ११ पारितोषिके प्राप्त करणार्या प्राची अग्रवाल आणि सात पदके प्राप्त करणार्या गौरी जोशी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. सहा पदके प्राप्त करणारे आदित्य खोडे, पूनम बेलेकर आणी अमोल धाकडे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, मानवविज्ञान आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास या शाखांकरिता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, अधिष्ठाता डॉ. राजेश सिंगरू, डॉ.संजय कविश्वर, डॉ. निर्मलकुमार सिंग आणि डॉ. राजश्री वैष्णव प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. चौधरी आणि डॉ. दुधे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. हिवसे यांनी आभार मानले. डॉ. अमृता इंदूरकर यांनी संचालन केले. यावेळी उपकुलसचिव प्रदीप बिनीवाले, डॉ. राजेंद्र उतखेडे, मोतीराम तडस आणि जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाठक यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r6n2HJ
via nmkadda