Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ३ जुलै, २०२१, जुलै ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-03T06:47:14Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

नोकरी शोधताय? सरकारच्या 'महाजॉब्स' पोर्टलवर करा नोंदणी ! Rojgar News

Advertisement
Mahajobs Portal: डिग्री, कौशल्य शिक्षण असून देखील नोकरी नसलेल्या तरुणांची संख्या राज्यात मोठी आहे. सरकारी नोकरीच्या अनेक संधी कधी येऊन जातात हे अनेकदा तरुणांना कळत नाही. सध्या करोनाच्या पार्श्वभुमीवर तरुणांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो तरुण बेरोजगार झाले आहेत. महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government)च्या पुढाकाराने बेरोजगारांसाठी 'महाजॉब्स' पोर्टल (Mahajobs Portal) चालविण्यात येते. यामध्ये नोकऱ्यांसदर्भात अपडेट येत असतात. यातील तुमच्या शिक्षण आणि अनुभवानुसार असलेली नोकरी तुम्ही निवडू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला 'महाजॉब्स' पोर्टलवर स्वत:ला रजिस्टर (Mahajob Portal Registration) करणे गरजेचे आहे. भूमीपुत्रांना नोकरी उपलब्ध करुन देणे हा 'महाजॉब्स' पोर्टलचा हेतू आहे. या माध्यमातून औद्द्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना लागणार कुशल/ अकुशल कामगारांना संधी मिळते. राज्याच्या कानाकोपऱ्यातील नोकरींचा आढावा तुम्हाला घरबसल्या घेता येणार आहे. यासाठी नोंदणी आवश्यक आहे. 'महाजॉब्स' पोर्टलची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. त्यावर जाऊन तुम्ही स्वत:ला रजिस्टर करुन नोकरी मिळवू शकता. महाराष्ट्र सरकारच्या‘महाजॉब्स’पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाईट https://ift.tt/2ZNqYQx वर जावे लागेल. लिंक ओपन झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला स्वत:चे नाव टाकायचे आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे नागरिक असलेल्यांना नोकरीत प्राधान्य मिळेल. यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये तुमचा मोबाईल क्रमांक टाका. यानंतर तुम्हाल ओटीपी येईल. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून पडताळणी करा. तसेच ईमेल आयडीद्वारे देखील ओटीपी मिळवून नोंदणी करा. तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर पुढील माहिती मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही वापरत असलेला ईमेल आयडी टाका. यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल. हा पासवर्ड काळजीपूर्वक टाइप करा. कॅपच्या (captcha) व्यवस्थित टाईप करून सबमिट करा. पासवर्ड टाईप करताना त्यात किमान ८ कॅरेक्टर्स असावेत, तसेच पासवर्डमध्ये किमान १ कॅपिटल अक्षर+१ लोअरकेस अक्षर , १ नंबर आणि १ स्पेशल कॅरेक्टर्स असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला शैक्षणिक आणि तुमच्या कौशल्यासंदर्भात (Skills) माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यावर ‘Registration done successfully’ असा मेसेज येईल. आणि तूमची नोंदणी पूर्ण झाली असेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AqU0a7
via nmkadda