
IISER Pune Recruitment 2021 : पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत विविध पदांची भरती निघाली आहे. याद्वारे एकूण ५ जागा भरल्या जाणार आहे. विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि मिळणारा पगार वेगळा असणार आहे. मूळ जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बातमीखाली याची लिंक देण्यात आली आहे. भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा रिक्त आहेत. रिक्त पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यानुसार विपणन प्रकल्प व्यवस्थापक प्रमुख आणि दळणवळण कार्यकारी, प्रशासकीय अधिकारीपदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता बदलणार आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रमुख या एका पदासाठी पदव्युत्तर प्रमाणपत्र आणि संबंधित क्षेत्राचा दहा वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. यासाठी उमेदवाराचे वय ५० वर्षांहून अधिक नसावे. शिक्षण आणि अनुभवानुसार दीड ते दोन लाखापर्यंत पगार मिळू शकतो. सध्या या भरतीचा कालावधी १ वर्षांचा आहे. पण उमेदवाराचे काम पाहून हा कालावधी वाढवला जाऊ शकतो. प्रोजेक्ट मॅनेजर (शाळा) या पदासाठी अर्ज करणाऱ्याकडे पदवी प्रमाणपत्र आणि संबंधित क्षेत्राच किमान सहा वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. यासाठी उमेदवाराचे वय ४५ वर्षांहून अधिक नसावे. या पदासाठी शिक्षण आणि अनुभवानुसार ७५ हजार ते १ लाखपर्यंत पगार मिळू शकतो. या भरतीचा कालावधी १ वर्षाचा आहे. प्रोजेक्ट मॅनेजर (विद्यापीठ) पदासाठी पदवी प्रमाणपत्र आणि संबंधित क्षेत्राचा सहा वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. यासाठी उमेदवाराचे वय ४५ वर्षांहून अधिक नसावे. निवड झालेल्या उमेदवारास शिक्षण आणि अनुभवानुसार ७५ हजार ते १ लाखापर्यंत पगार मिळू शकेल. मार्केटींग आणि कम्यूनिकेटींग एक्झिक्युटीव्ह पदासाठी मीडिया अॅण्ड कम्युनिकेशनची पदवी, मार्केटींगचा किमान ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. यासाठी उमेदवाराचे वय ४५ वर्षांहून अधिक नसावे. तसेच यासाठी शिक्षण आणि अनुभवानुसार ५० हजार ते ७५ हजारपर्यंत पगार मिळणार आहे. व्यवस्थापकीय अधिकारी पदासाठी पदवी प्रमाणपत्र व्यवस्थापकीय पदाचा ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. अनुभव आणि शिक्षणाच्या आधारे ४५ हजार ते ७० हजार पर्यंत पगार मिळू शकतो. यासाठी उमेदवाराचे वय ४५ वर्षांहून अधिक नसावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २० जुलै २०२१ पर्यंत अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r1tKii
via nmkadda
0 टिप्पण्या