Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ७ जुलै, २०२१, जुलै ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-07T09:47:14Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचा राजीनामा Rojgar News

Advertisement
डॉ. निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ( ) होणाऱ्या घडामोडींचा एक भाग म्हणून या राजीनाम्याकडे पाहिले जात आहे. आरोग्याचे कारण देत पोखरियाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच करोना संसर्गामुळे पोखरियाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सुमारे १५ दिवस आयसीयूत होते. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा कामाला सुरूवात केली होती. मंगळवारी सायंकाळी त्यांनी जेईई एप्रिल, मे सत्राच्या सुधारित तारखांचीही घोषणा केली होती. करोना काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा, अभ्यासक्रम यासंदर्भातले निर्णय घेण्यामध्ये पोखरियाल यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात (Modi Government) २०१९ मध्ये दुसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले तेव्हा निशंक यांना शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. पोखरियाल यांच्यासह महिला आणि बालविकास मंत्री देबाश्री चौधरी आणि केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनीही राजीनामा दिला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dQOt2C
via nmkadda