पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा दिलासा, ऑगस्टमध्ये देता येणार परीक्षा Rojgar News

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा दिलासा, ऑगस्टमध्ये देता येणार परीक्षा Rojgar News

affect on student Exam: राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईसह कोकण विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. पूर परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सुरु असलेल्या परीक्षेकरिता जे विद्यार्थी अतिवृष्टीमुळे बसू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांनी दिलासा दिला आहे. राज्य तंत्र शिक्षण परीक्षा संपल्यानंतर म्हणजे ३ ऑगस्टनंतर फेर परीक्षेचे आयोजन करण्यात येईल असे ते म्हणाले. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात पावासाचा हाहाकार राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून थैमान घालणाऱ्या महापुरात आतापर्यंत ७६ जणांचा बळी गेला आहे. एकूण ५९ लोक बेपत्ता झाले असून ७५ जनावरे दगावली आहेत. अतिवृष्टीनंतर घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ३८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत ४० नागरिकांचे प्राण गेले. येथे दरडीखाली अजूनही काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे सुरूच असून आज रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत दरड कोसळली. मात्र यात मनुष्यहानी किंवा घरांचे नुकसान झालेले नाही. सांगली जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ (Sangali ) झाली आहे. परिणामी आज २४ जुलैपर्यंत शिराळा, वाळवा, पलूस, मिरज व कडेगाव तालुक्यांमधील ५७ रस्ते पाण्याखाली गेले आहेत. आयडॉलच्या परीक्षा पावसामुळे स्थगित मुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन लर्निंग (IDOL)च्या परीक्षा पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सेमिस्टर १ आणि सेमिस्टर २ च्या परीक्षा ३० जुलै २०२१ पासून सुरू होणार होत्या. मात्र त्या आता १८ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होतील. कोणकोणत्या परीक्षा लांबणीवर? -एफवाय बीए, एफवाय बीकॉम, एम.ए., एम.कॉम. सेमिस्टर १ - जानेवारी-डिसेंबर २०२१ - एफवाय बीए, एफवाय बीकॉम, एफ.वाय. बीएससी. आयटी. एमएससी मॅथ्स, एसएससी आयटी आणि एफ.वाय.एमसीए. - जुलै २०२० सेमिस्टर २ - बी.एससी. आयटी (सेमिस्टर ४,६), एमसीए (सेमिस्टर ४, ६) आणि पीजीडीएफएम आणि पीजीडीओआरएम (सेमिस्टर २) या लांबणीवर पडलेल्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kXjsPf
via nmkadda

0 Response to "पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा दिलासा, ऑगस्टमध्ये देता येणार परीक्षा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel