आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू Rojgar News

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू Rojgar News

International Update: देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत असून या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. त्याचबरोबर विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पदांची भरती प्रक्रिया व पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बीबीए (स्पोर्ट मॅनेजमेंट) व बीएससी (स्पोर्ट सायन्स) असे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक ६० प्रवेशक्षमता राहणार आहे. राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, वास्तुशास्त्रज्ञ शशी प्रभू, सिम्बायोसिसच्या प्रमुख संचालक डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते. केदार म्हणाले की, देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून चांगले प्रशिक्षक तयार होतील, राज्यातून चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास व्यक्त करून कुलगुरू व प्राध्यापकांची निवड तातडीने करून प्रवेश प्रक्रियेला वेग द्यावा, अशा सूचना केदार यांनी केल्या. प्रस्तावित क्रीडा विद्यापीठाने 'ऑन फील्ड' व 'ऑफ फील्ड'वर काम करून प्रशिक्षणावर अधिक भर द्यावा; तसेच चांगले प्रशिक्षक तयार करून त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, असे नियोजन करणे आवश्यक आहे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण या विद्यापीठाच्या माध्यमातून येथे उपलब्ध होईल, या विद्यापिठांतर्गत शालेय स्तरावरील क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण देता येईल, असे ठाकरे यांनी सांगितले. बकोरिया यांनी प्रास्ताविक करून क्रीडा विद्यापीठाबाबत सादरीकरण केले. दोन अभ्यासक्रम होणार सुरू आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठांतर्गत पहिल्या टप्प्यात दोन अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात येणार आहे. बी.बी.ए (स्पोर्ट मॅनेजमेंट) व बी.एससी (स्पोर्ट सायन्स) या दोन अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी 60 एवढी विद्यार्थी संख्या असेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zPQViP
via nmkadda

0 Response to "आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel