Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ३ जुलै, २०२१, जुलै ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-03T08:47:20Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

देशातील विद्यार्थ्यांना सेटेलाइट टीव्ही क्लासरुम देण्यासाठी इस्रोचा पुढाकार Rojgar News

Advertisement
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ()ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे. संस्था शाळांमध्ये तयार करण्यासाठी केंद्र सरकारला मदत करणार आहे. तसा प्रस्ताव इस्रोने केंद्र सरकारला पाठवला आहे. शाळांमध्ये सॅटेलाइट टीव्ही क्लासरुम कसे तयार करता येतील, आणि त्याचा विद्यार्थ्यांना कसा उपयोग होईल, याबाबतचे सादरीकरण इस्रोच्या संशोधकांनी तयार केले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्रोने २ जुलै २०२१ रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी सॅटेलाइट टिव्ही क्लासरुम राबविण्यात सरकारला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड १ ९ लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षापासून देशभर ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षण सुरू आहे. करोनामुळे विद्यार्थी आणि शाळा यांच्यामधील शैक्षणिक दरी मिटवण्यासाठी हे सॅटेलाइट टीव्ही क्लासरुम एक महत्त्वाचा दुवा ठरतील, असा विश्वास इस्रोला वाटत आहे. शुक्रवारी इस्रोने संसदीय स्थायी समितीसमोर प्रस्ताव मांडला. इस्रोने राज्यांना उपग्रह टीव्ही वर्गखोल्या सुरू करण्यासाठी सेटेलाइट राइट्स देण्याचीही तयारी दर्शवली आहे. जी राज्ये ही टेक्नॉलॉजी वापरण्यास इच्छुक असतील त्यांना हे उपग्रह अधिकार प्रदान करण्यात येतील. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी २ जुलै रोजी झालेल्या बैठकीला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांसमोर विद्यार्थ्यांसाठी उपग्रह टीव्ही वर्गखोल्यांच्या वापराविषयी सादरीकरण केले. इस्रोच्या मदतीने विद्यार्थी उपग्रह टीव्ही वर्गखोल्यांचा लाभ घेऊ शकतात आणि स्मार्टफोन आणि डेटा कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सुटू शकतो. हा उपक्रम निश्चितच सध्याच्या शिक्षणपद्धतीत किंवा देशात एकूण शिक्षण पद्धतीमध्ये क्रांतीकारक बदल घडवून आणील. भारत सरकारने यापूर्वी इस्त्रोला शालेय विद्यार्थ्यांसाठी उपग्रह टीव्ही वर्गांच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना मदत करण्यास सांगितले होते. शुक्रवारी झालेल्या बैठकीत उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा आणि अरुणाचल प्रदेशसह पाच राज्यांचे शिक्षण सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yibNyb
via nmkadda