Advertisement

: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १९ जागा भरण्यात येणार असून याची शैक्षणिक पात्रता आणि पगार वेगळा असणार आहे. विविध पदांच्या एकूण १९ जागांमध्ये उप अभियंता आणि ज्युनिअर अभियंता पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो रेलच्या अधिकृत वेबसाइटवरील करिअर सेक्शनमध्ये जा. तिथले नोटीफिकेशन डाऊनलोड करुन नीट वाचून काळजीपूर्वक अर्ज करा. उमेदवारांकडे वैयक्तिक ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर असावा. नोकर भरतीची प्रवेश प्रक्रिया सुरु असताना दोन्ही सुरु असावेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे वैयक्तिक मुलाखत आणि इतर महत्वाची माहिती वैयक्तिक ईमेल आयडीवर पाठविण्यात येईल. या पदासाठी ३५ हजार ते १ लाख ६० हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. ही भरती ३ वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. यासंदर्भातील अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. बातमीखाली अधिकृत वेबसाइट आणि नोटिफिकेशनची लिंक देण्यात आली आहे. १७ जुलै ते २२ ऑगस्ट रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक सुरु राहणार आहे. शेवटच्या मिनिटाला गर्दी करण्यापेक्षा उमेदवारांनी आधीच अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज सबमिट झाला नाही तर नेटवर्क, इंटरनेट प्रॉब्लेम अशी कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत. ऑनलाइन फॉर्ममधील सर्व रकाने भरावे लागणार आहेत. अर्ज भरुन झाल्यावर उमेदवाराने प्रिव्ह्यू काळजीपूर्वक पाहावा. तिथे एडीटचा पर्याय असेल. काही राहीले असल्यास किंवा बदलायचे असल्यास एडीट करु शकता. अर्ज सबमिट झाल्यानंतर एडीटचा पर्याय दिला जाणार नाही. भरतीच्या संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे असतील. मुलाखत किंवा मेडिकल टेस्टसाठी बोलावलेल्या उमेदवाारांना प्रवास भत्ता दिला जाणार नाही. या पदांसाठी दिनांक २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करता येईल. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xQcHSX
via nmkadda