Advertisement
Nuclear Power Corporation of India Limited Recruitment 2021: असणाऱ्यांच्या कामाची बातमी आहे. कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Nuclear Power Corporation of India Limited)मध्ये नोकरीची संधी आहे. यासाठी कंपनीतर्फे जाहीरात काढण्यात आली आहे. यामध्यमातूनन ट्रेड अप्रेंटिस पदांवरील भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. १५ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज हे केवळ ऑनलाइन माध्यमातूनच स्वीकारले जाणार आहेत. पोस्टाच्या माध्यमातून आलेल्या अर्जाांचा विचार केला जाणार नाही. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. एकूण १२१ पदं यामाध्यमातून भरली जाणार आहेत. या नोकरीसंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट npcil.nic.in पाहू शकता. आणि तिथे जाऊन अर्ज करु शकता. बातमीखाली वेबसाईटची थेट लिंक देण्यात आली आहे. या पदावंर भरती ट्रेड अप्रेंटिस -१२१ जागा शैक्षणिक योग्यता या पदवीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त दहावी पास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयची डिग्री देखील असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ वर्षे ते २४ वर्षांच्या आत असायला हवे. तसेच ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना वयातून तीन वर्षांची सवलत देण्यात आली आहे. एससी वर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची सवलत देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया या पदांवर उमेदवारांची निवड दहावी आणि आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. या भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. महत्त्वपूर्ण तारीख ऑनलाइन अर्ज करण्याची तारीथ - १५ जुलै २०२१ अधिकृत वेबसाइट - www.npcil.nic.in
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SQpeq8
via nmkadda