मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागात भरती, ५ जुलैपर्यत करा अर्ज Rojgar News

मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागात भरती, ५ जुलैपर्यत करा अर्ज Rojgar News

BMC HealthCare 2021: मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत डाटा व्यवस्थापक पदांच्या एकूण ५ जागा रिक्त आहे. या जागांसाठी पालिकेकडून जाहीरात काढण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाईट, नोकरीची जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. पालिकेच्या या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. डाटा व्यवस्थापक पदांच्या ५ जागा रिक्त आहेत. यासाठी उमेदवार आय.टी. किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये बी.टेक/ बी.एस.सी.आय.टी./ बी.सी.ए. मध्ये पदवीधारक असणे गरजेचे आहे. उमेदवाराला आयटी, एमएस ऑफिस संभाळण्याचा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. २२ ते ४० वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांना दिनांक ५ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीतून केलेल्या उमेदवारांची निवड ही ६ महिन्यांसाठी असणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच या पदासाठी ७५ हजार दर महिना इतका पगार असणार आहे. निवड प्रक्रिया पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचे गुण पाहिले जातील पहिल्याच वेळेस पास झालेल्यांना प्राधान्य दिले जाईल. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पास असणाऱ्यांचे ५ गुण आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये पास असलेल्यांचे १० गुण वजा होतील. त्यानंतर पास झालेले अपात्र ठरतील. उमेदवारांना समान गुण असल्यास जन्म तारखेनुसार अधिक वयाला प्राधान्य दिले जाईल. उमेदवारांनी दिला गेलेला गुगल डॉक्सचा फॉर्म भरणे गरजेचे आहे. उमेदवारांना त्यांच्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर नोकरी संदर्भातील पुढील माहिती दिली जाईल. त्यावेळी उमेदवारांना मूळ कागदपत्र, झेरॉक्स घेऊन यावी लागेल. ५ जुलै २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36a9GjS
via nmkadda

0 Response to "मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागात भरती, ५ जुलैपर्यत करा अर्ज Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel