Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १२ जुलै, २०२१, जुलै १२, २०२१ WIB
Last Updated 2021-07-12T12:47:44Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू Rojgar News

Advertisement
राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित, खासगी महाविद्यालयांमध्ये बारावीनंतर करता येणाऱ्या (Post HSC Diploma 2021) औषधनिर्माण शास्त्र (फार्मसी), हॉटेल मॅनेजमेंट, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया शनिवारी, १० जुलैपासून सुरू झाली आहे. प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि प्रत्यक्ष पडताळणी, असे दोन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. दोन ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशअर्ज भरून कागदपत्र छाननीसाठी कागदपत्रे अपलोड किंवा प्रत्यक्ष सादर करता येणार आहेत. १० ऑगस्ट रोजी या सर्व अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर प्रवेश सुरू होतील, असे तंत्रशिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील २३ महाविद्यालयांत या अभ्यासक्रमांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष छाननीचा पर्याय निवडल्यास या केंद्रांवर जाऊन कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. प्रवेशासाठी अर्ज मात्र ऑनलाइनच करावे लागणार असल्याचे तंत्रशिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन कागदपत्रांच्या छाननीचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. २०२१मध्ये बारावीच्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप लागले नसल्याने या परीक्षेचा आसन क्रमांक भरावा लागणार आहे. बारावीच्या निकालानंतर या विद्यार्थ्यांना त्यांचा बारावीच्या निकालाचा तपशील अर्जात भरून अर्ज पूर्ण करता येईल. विद्यार्थ्यांना https://ift.tt/3e9knrD या लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करून अर्ज भरता येणार आहे. प्रवेशअर्जांसाठी विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठीही दोन ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असून, ऑनलाइन पेमेंटद्वारे शुल्क भरण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थी हवेत बारावी उत्तीर्ण डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन फार्मसी आणि डिप्लोमा इन सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे. या तिन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत दोन ऑगस्ट आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2U52Iu2
via nmkadda