Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २७ जुलै, २०२१, जुलै २७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-27T06:43:32Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी मुदतवाढ Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आता विद्यार्थ्यांना ३० जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी ही मुदत २३ जुलै होती. यानंतर छाननी करून पहिली गुणवत्ता यादी २ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालाअगोदरच सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत होती. ही मुदत संपल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना प्रथम तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांनतर ऑनलाइन अर्ज करीत आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड कराव्यात. आता जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी २ ऑगस्टला जाहीर होणार आहे. ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान यावर आक्षेप स्वीकारले जाणार असून, ७ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. हेल्पलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी मदत कक्षही स्थापन करण्यात आला असून, ८६९८७४२३६०, ८६९८७८१६६९ या क्रमांकावर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत संपर्क साधता येणार आहे. अधिक माहितीसाठी https://ift.tt/3wbNzEi या संकेतस्थळावर भेट द्यावी. असे आहे वेळापत्रक - ऑनलाइन अर्ज भरणे - ३० जुलैपर्यंत - कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती - ३० जुलैपर्यंत - तात्पुरती गुणवत्ता यादी - २ ऑगस्ट - गुणवत्ता यादीवरील आक्षेप - ३ ते ५ ऑगस्ट - अंतिम गुणवत्ता यादी - ७ ऑगस्ट हे लक्षात ठेवा - ई-अर्ज किंवा प्रत्यक्ष अर्ज पडताळणीचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत अर्ज प्रक्रिया आणि पात्रता पूर्ण केली नाही, तर विद्यार्थ्यांना कॅप प्रवेश प्रक्रियेत अर्ज करता येणार नाही. - राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर करावे. - राज्य मंडळातील विद्यार्थ्यांनी अर्ज करताना आपला इयत्ता दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक भरावा. आसन क्रमांक नसेल, तर तो शाळेकडून उपलब्ध होईल. त्यासाठी शाळेशी संपर्क साधावा. - आसन क्रमांक टाकल्यानंतर या परीक्षेत प्राप्त गुण थेट मंडळाकडून घेऊन ते अपडेट केले जातील. - सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज पूर्ण करावे लागणार आहेत. - निकालात ग्रेड असेल तर समकक्ष गुणांमध्ये रुपांतर करून प्रमाणपत्र सादर करावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WqGcwI
via nmkadda