Advertisement

Recruitment2021: मुंबई येथील कंपनीत कायदेशीर सल्लागार पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. महावितरणच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी ३० जुलै २०२१ पर्यंत अर्ज पाठवणे गरजेचे आहे. औरंगाबाद, कल्याण आणि नागपूर विभागासाठी ही भरती असणार आहे. उमेदवारास एका महिन्याच्या आत म्हणजे ऑगस्टपर्यंत मुंबईत वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कायदेशीर सल्लागार पदांच्या एकूण ३ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगाराची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. कंपनीतर्फे नमुना अर्ज देण्यात आला आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात माहिती मिळेल. शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे अधिकृत विद्यापीठातून लॉची पदवी असणे गरजेचे आहे. डिस्ट्रीक्ट जज पदाचा ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. ३० जुलै २०२१ पर्यंत अर्जदाराचे वय ६६ वर्षांच्या वर नसावे. पदाचा कालावधी पदाचा कालावधी तीन वर्षांचा असेल. त्याआधी उमेदवाराच्या वयाची ६६ वर्षे पूर्ण झाली तर हा कालावधी संपुष्टात येईल. अर्ज शुल्क उमेदवाराला ७०८ रुपये अर्ज शुल्क डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून भरावे लागेल. कोणत्याही कारणाने निवड प्रक्रीया न झाल्यास उमेदवारांना अर्ज शुल्क परत मिळणार नाही. डिमांड ड्राफ्टच्या मागच्या बाजूस उमेदवाराने स्वत:चे पूर्ण नाव लिहायचे आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता उमेदवारांनी आपला अर्ज चीफ जनरल मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००५१ या पत्त्यावर पाठवायचा आहे. दिनांक ३० जुलै २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AVW0r7
via nmkadda