Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २० जुलै, २०२१, जुलै २०, २०२१ WIB
Last Updated 2021-07-20T02:45:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

अकरावीची सीईटी २१ ऑगस्टला होणार ! Rojgar News

Advertisement
11std : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते त्या ११ वीच्या सीईटी परीक्षेची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरात ही परीक्षा २१ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २० जुलै सकाळी ११.३० वाजल्यापासून ते २६ जुलै पर्यंत अर्ज भरता येणार आहे. हा अर्ज ऑनलाइन माध्यमातून भरायचा आहे. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल लावण्यात आला. दहावीला मोठ्या संख्येने विद्यार्थी पास झाले आहेत. अशावेळी अकरावीचे प्रवेश कसे होणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. यासाठी या सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या सीईटीमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला पाहिजे असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी इयत्ता ११ वीची सीईटी निर्णायक ठरणार आहे. या सीईटीच्या आधारेच विद्यार्थ्यांना विविध नामांकीत महाविद्यालयांमध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात येणार आहे. ही परीक्षा १०० गुणांची असणार आहे. या प्रवेश परिक्षेमध्ये राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. १०० गुणांच्या या परिक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार असल्याचे मंडळाने यापुर्वीच जाहीर केले आहे. तसेच या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेशात प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतर उपलब्ध जागांवर जे परीक्षेसाठी बसले नसतील त्यांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2URzZZT
via nmkadda