Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २७ जुलै, २०२१, जुलै २७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-27T08:43:47Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

'या' मुलाखतीत नापास झाल्याने डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न राहिले अपूर्ण, जाणून घ्या Rojgar News

Advertisement
Dr. A.P.J. inspirational Story: आपल्या अपयशातून शिकणारी व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते. ज्या व्यक्ती अयशस्वी झाल्यावर हार मानतात त्यांना देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे (A.P.J. Abdul Kalam) यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. आज त्यांची पुण्यतिथी आहे. या औचित्याने एपीजे अब्दुल कलाम यांच्या त्या मुलाखतीबद्दल जाणून घेऊया ज्यामध्ये ते अयशस्वी झाले होते. कलाम हे नंतर भारताच्या मिसाइल डेव्हलपमेंट कार्यक्रमाची प्रेरणा बनले. पृथ्वी, अग्नी यांसारख्या मिसाइल बनविण्याच्या कामात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर ते देशाचे राष्ट्रपती बनले. एपीजे अब्दुल कलाम यांचे देशाच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. कलाम हे एका मुलाखतीत नापास झाले होते. पण यातून त्यांनी हार मानली नाही. यांना फायटर पायलट बनायचे होते. हे त्यांचे सर्वात आवडते स्वप्न होते. पण ते हे स्वप्न पूर्ण करु शकले नाहीत. “My Journey: Transforming Dreams into Actions” या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव कथन केले आहेत. मद्रास इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतून एअरोनॉटिकल इंजिनीअरिंग (aeronautical engineering) शिक्षण घेतल्यानंतर त्यांना हवाई उड्डाणामध्ये करिअर बनवायचे होते. लहानपणापासून त्यांना प्लेन उडविण्याची इच्छा होती. हे त्यांच्या आवडीचे स्वप्न होते. पण नशिबाला काहीतरी वेगळंच अपेक्षित होत. ते SSB मुलाखतीत अयशस्वी ठरले. ज्यामुळे त्यांना एअरफोर्समध्ये नोकरी मिळाली नाही. अब्दुल कलाम यांना दोन मुलाखतींसाठी बोलावणे आले. पहिला कॉल हा इंडियन एअरफोर्स, देहरादून इथून होता आणि दुसरा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, दिल्लीतून डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल डेव्हलपमेंट अॅण्ड प्रोडक्शन (DTDP) यासाठी होता. DTDP मध्ये मुलाखत सोपी होती पण एअरफोर्स सिलेक्शन बोर्डसाठी इंजिनीअरिंग ज्ञानासोबत त्यांना उमेदवाराकडे विशेष पद्धतीचा स्मार्टनेस अपेक्षित होता. एअरफोर्सच्या मुलाखतीमध्ये कलाम यांनी २५ उमेदवारांमधून नववे स्थान मिळविले होते. त्यांना भरती केलं गेलं नाही. कारण त्यावेळी ८ जागा भरल्या जाणार होत्या. यामुळे मला ती नोकरी मिळाली नाही असे कलाम यांनी आपल्या पुस्तकात लिहिले. २५ जणांनी मुलाखतीमध्ये भाग घेतला होता. यामध्ये अयशस्वी झाल्याने खूप निराश झाल्याचे त्यांनी लिहिले आहे. मी एक एअरफोर्स पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलो. पण आपल्याला आपल्या आतील गुण शोधून आयुष्यात पुढे जात राहण्याची गरज असल्याचे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे. १४७ पानांच्या या पुस्तकामध्ये कलाम यांनी आपल्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिलाय. आपल्या आईवडीलांना होडी बनवतानाचा पाहील्याचा अनुभव त्यांनी लिहिला आहे. त्यांनी कशाप्रकारे वृत्तपत्र विकण्याचे काम लहानपणी सुरु केले? याचा अनुभव देखील त्यांनी लिहिला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3f2eEnL
via nmkadda