Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २४ जुलै, २०२१, जुलै २४, २०२१ WIB
Last Updated 2021-07-24T06:43:24Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

सीए फाऊंडेशन परीक्षा आजपासून; पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान? Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सीए फाऊंडेशन या अभ्यासक्रमाची परीक्षा आज, शनिवारपासून सुरू होणार आहे. मात्र पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे शक्य नसल्याने याबाबत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटने खुलासा करावा, अशी मागणी होत होती. मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण मिळू शकले नाही. सीए फाऊंडेशन जून-जुलै २०२१ परीक्षा देशभरात घेतली जाणार आहे. ही परीक्षा २४, २६, २८ आणि ३० जुलै दरम्यान होणार आहे. मात्र, राज्यात रत्नागिरी, रायगड येथील पूरग्रस्त भागात परीक्षा कशी देणार, असा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचायला अडचणी येणार आहेत त्यांच्या परीक्षेचे काय, असा प्रश्नही पालक विचारत आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांत परीक्षा केंद्रे असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचणी येत असतील तर नेमके काय केले जाणार? याबाबत दिवसभर सोशल मीडियावरून विचारणा होत होती. मात्र रात्री उशिरापर्यंत इन्स्टिट्यूटतर्फे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. दरम्यान, करोना परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना ऑप्ट आउटचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जुलैची परीक्षा न देता या पर्यायाद्वारे नोव्हेंबरमध्ये परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांनी ३० जुलैपर्यंत हा पर्याय स्वीकारायचा आहे. केव्हा कोणती परीक्षा होणार ? सीए फाउंडेशन कोर्स २०२१ - २४,२६,२८ आणि ३० जुलै २०२१ सीए इंटर कोर्स ग्रुप १ (Old Scheme) - ६,८,१० आणि १२ जुलै २०२१ सी इंटर कोर्स ग्रुप २(Old Scheme) - १४,१६आणि १८ जुलै २०२१ सीए इंटर कोर्स ग्रुप १ (New Scheme) - ६,८,१० आणि १२ जुलै २०२१ सीए इंटर कोर्स ग्रुप २ (New Scheme) - १४,१६,१८ आणि २० जुलै २०२१ सीए फाइनल कोर्स ग्रुप १ (Old & New Scheme) - ५,७,९आणि ११ जुलै २०२१ सीए फाइनल कोर्स ग्रुप २ (Old & New Scheme) - १३,१५,१७आणि १९ जुलै २०२१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3x85fS0
via nmkadda