Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १९ जुलै, २०२१, जुलै १९, २०२१ WIB
Last Updated 2021-07-19T09:45:06Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

पदवी अंतर्गत प्रवेशासाठी यंदा कॉमन एंट्रन्स टेस्ट नसणार, यूजीसीचा निर्णय Rojgar News

Advertisement
No for : अंडरग्रॅज्युएट प्रवेशासाठी घेतली जाणारी सेंट्रल यूनिव्हर्सिटी कॉमन एंट्रन्स टेस्ट (CUCET) यंदा घेतली जाणार नाही. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)ने रविवारी यासंदर्भातील घोषणा केली आहे. यूजीसीने ट्वीट करुन ही माहिती दिली. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एका कॉमन एंट्रन्स टेस्टच्या आधारे विद्यापीठात प्रवेश होणार विद्यापीठातील प्रवेश होतील अशी घोषणा याआधी शिक्षण विभागाने केली होती. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत काही सूचना केल्या. त्यानुसार विद्यापीठांमध्ये सर्व अंडरग्रॅज्युएट कोर्सेसच्या प्रवेशसाठी यूनिव्हर्सिटी कॉमन एंट्रन्स टेस्ट (CUCET) च्या पद्धतीचे निरीक्षण करण्यासाठी एक समिती बनविण्यात आली होती. १ ऑक्टोबरपर्यंत नव्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ग सुरु करा असे निर्देश यूजीसीने सर्व विद्यापीठांना दिले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डासहित शाळांचे बोर्ड ३१ जुलैपर्यंत आपले निकाल जाहीर करतील. यानंतर उच्च शिक्षण संस्थांनी आपले प्रवेश सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३० सप्टेंबर ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे. एक नोटिफिकेशननुसार, यूजीसीने शैक्षणिक संस्थांना करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन/ ऑफलाइन माध्यमातून यूजी आणि पीजी कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यास सांगितले. यूजीसीने विद्यापीठ आणि कॉलेजांचे इंटरमीडिएट सेमिस्टर / शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन / ऑफलाइन माध्यमातील वर्ग तात्काळ सुरु करण्यास सांगितले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UYgPBr
via nmkadda