TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

डीआरडीओत अप्रेंटिस भरती; ५७ पदे भरणार Rojgar News

Apprentice Recruitment 2021: कॉम्बॅट व्हेइकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, डीआरडीओ (Combat Vehicles Research & Development Estt DRDO, Avadi, Chennai), चेन्नईने अप्रेंटिस पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या अंतर्गत एकूण ५७ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत, ते एनएटीएसच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://ift.tt/2iycsa9 येथे जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे अर्ज करण्याची अखेरची मुदत २० जुलै २०२१ आहे. नोटिफिकेशननुसार, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस या एकूण ५७ पदांवर भरती केली जाणार आहे. यात ग्रॅज्युएटसाठी ३१ पदे आणि २६ टेक्निशिअन पदांवर नियुक्ती केली जाईल. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की या पदांवर अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात चूक झाली तर अर्ज रिजेक्ट केला जाईल. महत्त्वाच्या तारखा अप्रेंटिस पदांवर ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सुरुवात - ५ जुलै २०२१ अप्रेंटिस पदांवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया- २० जुलै २०२१ अप्रेंटिस पदांवर शॉर्टलिस्टेड लिस्ट- ३० जुलै २०२१ शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी - ९ ऑगस्ट, २०२१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hmmJ8o
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या