Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १४ जुलै, २०२१, जुलै १४, २०२१ WIB
Last Updated 2021-07-14T10:47:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबईत पोस्ट विभागात भरती, ९ ऑगस्टपर्यंत करा अर्ज Rojgar News

Advertisement
Mumbai Main Motor Service Recruitment2021: मुंबईत भारतीय पोस्टल विभागामध्ये भरती असून यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. मुंबईतील मेल मोटार सेवा अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. या ठिकाणी आस्थापनेवर वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण १६ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवाराने दिलेल्या नमुन्यात अर्ज भरुन पाठविणे गरजेचे आहे. कालावधी वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या १६ जागा रिक्त असून मुख्य जाहिरातीमध्ये पदांनुसार शैक्षणिक पात्रतेची माहिती देण्यात आली आहे. एससी, एसटी, ओबीसी, ईबीएससाठी जागा राखीव असणार आहेत. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही भरती असणार आहे. पगारउमेदवाराला १९ हजार ९०० इतका पगार (सातव्या वेतन आयोगानुसार भत्ता) दिला जाणार आहे. १८ ते २७ वर्ष वयाचे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. एससी आणि एसटीसाठी ५ वर्षांची तर ओबीसीसाठी ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. शैक्षणिक आर्हताउमेदवाराकडे जड आणि हलक्या वाहनाचे अधिकृत लायसन्स असणे गरजेचे आहे. मोटर मेकॅनिकलची माहिती असणे गरजेचे आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता वरिष्ठ मोटर व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, १३४-ए, एस. के. अहिरे मार्ग, वरोली, मुंबई, पिनकोड -४०००१८ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पाठवलेले अर्ज ९ ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचतील याची काळजी अर्जदारांनी घ्यायची आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rb3DoR
via nmkadda