TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीएमएम सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

MU Session 6 Result: मुंबई विद्यापीठातील थर्ड ईयर बीएमएमच्या सहव्या सत्राची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मे २०२१ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या आंतरविद्या शाखेच्या (Interdisciplinary Faculty) तृतीय वर्ष या परीक्षेचा जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल ९४.९८ टक्के लागला आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. परीक्षेचा तपशिल मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेत एकूण ३ हजार ७२६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ५ हजार १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार १७१ एवढे विद्यार्थी परीक्षेत बसले होते. तर १९ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत १९७ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. इथे पाहा निकाल या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ https://ift.tt/2eryysJ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. निकाल थेट पाहण्यासाठी बातमीखाली लिंक देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातर्फे उन्हाळी सत्राचे आजपर्यंत ५४ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तीन निकाल जाहीर आज विद्यापीठाने बीएमएम सोबतच बीएस्सी सत्र ५ आणि बीई (बायोमेडीकल इंजिनिअरिंग) सत्र ७ असे तीन निकाल जाहीर केले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hR5U5y
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या