नव्या वेबसाईटवर कशी कराल अकरावी सीईटीसाठी नोंदणी? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या Rojgar News

नव्या वेबसाईटवर कशी कराल अकरावी सीईटीसाठी नोंदणी? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या Rojgar News

maharashtra : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता अकरावी प्रवेश कसे होणार? याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत होते. दरम्यान परीक्षा देणाऱ्यांना कॉलेज निवडीत प्राधान्य असेल असे राज्य मंडळातर्फे आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अकरावी सीईटीसाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. राज्य मंडळाच्या नव्या वेबसाइटवर आजपासून (२६ जुलै) दुपारी ३ वाजल्यापासून अकरावी सीईटीची नोंदणीला सुरुवात होणार आहे. याआधी २० जुलै सकाळी ११.३० पासून ही नोंदणी करता येत होती. पण तांत्रिक अडचणींमुळे दुसऱ्या दिवशीच वेबसाइट बंद करण्यात आली. आज देण्यात येणारी नवी लिंक २ ऑगस्ट रात्री ११.५९ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. खालील स्टेप्स फॉलो करुन तुम्ही अकरावी सीईटीची नोंदणी करु शकता. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. स्टेप १- सर्वप्रथम मंडळाची अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3BHVHQT वर लॉगिन करा स्टेप २- ईमेल आयडी (असल्यास) टाका स्टेप ३- आधीचा मोबाईल क्रमांक अपडेट करा किंवा नव्याने नोंदवा स्टेप ४- परीक्षेचे माध्यम निवडा. सेमी इंग्रजीचा पर्याय निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांच्या प्रश्नासाठी इंग्रजी माध्यम असणार आहे. तसेच सामाजिक शास्त्र (इतिहास आणि राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यांना एक माध्यम निवडावे लागेल. स्टेप ५- परीक्षा केंद्र निवडण्यासाठी तात्पुरत्या किंवा कायमच्या राहण्याच्या पत्त्यावरुन जिल्हा आणि तालुका त्यानंतर शहराचा विभाग (WARD)निवडा. स्टेप ६- दहावीचा अर्ज भरताना SEBC प्रवर्गाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना सुधारित तरतुदीनुलाप खुला प्रवर्ग निवडावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी २० जुलै ते २१ जुलै या कालावधीमध्ये अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली असेल त्यांना वेबसाइटवर अर्ज क्रमांक टाकून पूर्वीचा अर्ज पाहता येईल. अशावेळी विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नसल्याचे राज्य शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण ही वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली नसले तर विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तर सीईबीएसई, आयसीएसई आणि इंतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना १७८ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया २८ जुलैला दुपारी ३ वाजल्यापासून सुरु होईल. याची माहिती त्यांना स्वतंत्रपणे देण्यात येईल. (ही लिंक २६ जुलै दुपारी ३ वाजल्यापासून सुरु होईल)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zAK1O9
via nmkadda

0 Response to "नव्या वेबसाईटवर कशी कराल अकरावी सीईटीसाठी नोंदणी? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel