Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २७ जुलै, २०२१, जुलै २७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-27T07:43:13Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

प्रवेशाचे 'इंजिनीअरिंग': अभियांत्रिकीला प्रवेश घेण्याआधी 'ही' तयारी नक्की करा Rojgar News

Advertisement
- डॉ. श्रीराम गीत इंजिनीअर होणे हे सध्या कधी नव्हे इतके सोपे झाले आहे. त्यात येत्या काळातील येऊ घातलेल्या बदलांमुळे अधिकाधिक सोपेपण येणार आहे; मात्र इंजिनीअर झाल्यावर () काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर सापडणे जास्तच कठीण होत चालले आहे. या साऱ्यावर नेमकेपणाने; पण गांभीर्याने आपण या आठवड्यात माहिती करून घेणार आहोत. मी लिहित असलेली कोणतीही बाब पालकांनी व विद्यार्थ्यांनी किमान तीन व्यक्तींकडून जरूर तपासून घ्यावी, ही विनंती. अखेरच्या वर्षात शिकणारी त्याच शाखेतील विद्यार्थी/विद्यार्थिनी ही पहिली व्यक्ती. तिच्याकडून महाविद्यालय, अभ्यासक्रम, अडचणी, कॅम्पस प्लेसमेंट, अध्यापक या साऱ्याची किमान माहिती नक्की मिळते. ज्या शाखेत आपल्याला प्रवेश घ्यावासा वाटतो, त्या शाखेतून पास झालेला आणि सध्या नोकरी/व्यवसाय करीत असलेला इंजिनीअर ही दुसरी व्यक्ती. येथे 'काम करणारा इंजिनीअर' असे मुद्दाम नमूद करीत आहे. 'जीआरई'ची तयारी करणारा (GRE), एमबीए प्रवेश परीक्षेसाठी (MBA) क्लास लावलेला किंवा 'गेट'ची (GATE) तयारी करणारा, अशा पदवीधराशी ही चर्चा नको; कारण यातील सारेच तुम्हाला सहज उपलब्ध होतील! गेल्या आठवड्यात कम्प्युटरबद्दल लिहिलेच होते. त्या शाखेची पदवी घेऊनही लाखभर रुपये फी भरून सीडॅक, एम्बेडेड, सायबर सिक्युरिटी आदी कोर्स करणारे सहज भेटतात. आपण भेटले पाहिजे, अशी तिसरी व्यक्ती म्हणजे आपण शिक्षण घेत असलेल्या शाखेत पाच-सहा वर्षे अध्यापन करत असलेले शिक्षक. ही व्यक्ती कदाचित घडाघडा किंवा कदाचित हात राखून माहिती देईल. इंजिनीअरिंगची पदवी हाती आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न फार कमी लोकांना पडते, असा माझा गेल्या काही वर्षांतील करिअर कौन्सेलिंगचा अनुभव सांगतो; मात्र या व्यक्तींकडून त्या क्षेत्रातील संधींबद्दल अगदी खरी माहिती मिळेल, हे नक्की. ज्यांना इंजिनीअर व्हायचे आहे, नंतर अमेरिकेत जायचे आहे किंवा जमले, तर आयटीत शिरायचे आहे, त्यांनी या सर्व खटाटोपाला पूर्णविराम द्यावा; कारण त्यांच्यासाठी सीईटी, कॉलेजात प्रवेश, हातातील पदवी, जीआरईचा क्लास आणि एमएससाठी परदेशी प्रयाण असा सरळसोट रस्ताच उपलब्ध असतो. शेवटचे; पण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जे खरोखर तैलबुद्धीचे व अत्यंत हुशार, अभ्यासू आहेत, त्यांनीच केवळ पदवी शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा विचार करावा. ज्या पालकांकडे खर्च करण्याची मोठी ताकद आहे, असे सोडून अन्य विद्यार्थ्यांसाठी तो रस्ता धोक्याचा ठरू शकतो. (लेखक ज्येष्ठ करिअर काऊन्सेलर आहेत.)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l3UAVQ
via nmkadda