Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १ जुलै, २०२१, जुलै ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-07-01T12:47:10Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ऑनलाइन शिक्षणाचा ऑफलाइन अभ्यास Rojgar News

Advertisement
सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर गेल्या वर्षांपासून 'ऑनलाइन' या एका शब्दाने आपले सगळे आयुष्य व्यापले आहे. ऑनलाइन शाळा आणि ऑफलाइन अभ्यास यांचा ताळमेळ बसवण्यात पालकांची दमछाक होते आहे. एकीकडे 'वर्क फ्रॉम होम' आणि दुसरीकडे मुलांचा ऑनलाइन अभ्यास. दहावीचे वर्ष असेल तर हे आव्हान आणखी मोठे होत जाते. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, कामाचे स्वरूप वेगळे, जबाबदाऱ्या वेगळ्या आणि मुलांच्या अभ्यासाची पद्धत आणि त्यांची क्षमता वेगळी. या परिस्थितीत पालकांनी नेमकी कोणती भूमिका घ्यावी यासाठी काही टिप्स: * पालकांनी हे लक्षात घ्यायला हवे की दहावीचे वर्ष म्हणजे मुलांच्या करिअरचा पाया आहे. म्हणून, मुलांनी संकल्पना समजण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या मुलांना संकल्पना किती समजल्या आहेत, कोणते विषय सोपे / कठीण जातात याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. * पालकांनी आपल्या मुलाला काय प्रभावित / प्रेरित करते हे शोधून काढणे गरजेचे आहे. उदा : कौतुक, प्रोत्साहन, स्पर्धात्मक वृत्ती, मार्क्स, स्वतःचे ध्येय, घरच्यांचा धाक किंवा इतर काही कारण. * कशामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे हे जाणून घ्या. समजत नसल्यामुळे, कुवत नसल्यामुळे, घरच्यांचा धाक, अभ्यासात रस नसल्यामुळे की निव्वळ आळशीपणामुळे. एकदा ही कारणे समजली की त्यावर उपाय शोधणे सोपे जाते. * दहावीचे वर्ष आता सुरू होत आहे. येणाऱ्या १-२ महिन्यांत त्यांना शिस्तबद्ध जीवन शैलीसाठी तयार करा. सगळ्यांसाठीच एक वेळापत्रक तयार करा. त्याचे पालन होईल ह्याची काळजी घ्या. पण मुलांच्या मागे लागू नका. शाळेतील चाचण्या, परीक्षा, असाइनमेंट सुरुवातीपासूनच प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने घेतील याची खबरदारी घ्या. * मुलांना त्यांचे प्रोजेक्ट्स स्वतःहून करू द्या. मदत करण्याच्या नादात त्यांचे काम करू नये. यामुळे, मुलांना किती समजले आहे आणि स्वतःचा अभ्यास किती गांभीर्याने करत आहेत ह्याची तुम्हाला जाणीव होईल. * मुलं ऑनलाइन वर्गात लक्ष देत आहेत की नाही हे पाहा. मुलं ऑनलाइन ट्यूशन/क्लासचा अभ्यास नीट करू शकतात, मग शाळेत नक्कीच लक्ष देऊ शकतात, हे समजून घ्या. * परीक्षेचे स्वरूप समजून घेऊन, मुलांना सरावाद्वारे आणि शिक्षकांच्या सूचनेनुसार परीक्षाभिमुख करू शकता. पण त्यांच्या पाठी लागून किंवा सतत बडबड करून त्यांना अभ्यासाला बसवू शकत नाही. * तुमचे काम आणि घर यात अंतर ठेवा. आपल्या कामाचा ताण घरात किंवा मुलांवर येणार नाही याची खबरदारी घ्या. तुम्ही ज्या प्रकारे व्यक्त होता, त्या प्रकारे मुलेदेखील व्यक्त व्हायला शिकतात. * मुलं तुमचे अनुकरण करतात, म्हणून तुमची तुमच्या कामाप्रती किती बांधिलकी, गांभीर्य, जबाबदारी कशी व्यक्त करत आहात यावरून मुले अभ्यासाकडे कोणता दृष्टिकोन ठेवतील याचा अंदाज बांधू शकता. * किमान आठवाड्यातून एकदा तरी मुलांचे काय सुरू आहे, त्यांना काय हवे आहे, कुठल्या अडचणी येत आहेत, हे समजून घ्या. जमल्यास एकमेकांबरोबर मजा करण्यासाठी वेळ जरूर काढा. अभ्यास/ काम याव्यतिरिक्त गप्पा मारा. पालकांनी आपले काम सोडून किंवा सुट्टी घेतल्यामुळे मुलांचा अभ्यास होईलच असे नाही. पण त्यांच्याकडे लक्ष ठेवणे, त्यांची प्रगती कशी सुरू आहे, ते हवे तितकी मेहनत घेत आहेत की नाही, सातत्य आणि चिकाटीने अभ्यास करत आहेत की नाही, त्यांना संकल्पना किती समजत आहेत हे पाहणे या गोष्टी नक्कीच करता येतील. जेवढे तुम्ही शिक्षण / करिअरबद्दलचे गांभीर्य आणि तणावरहित घरचे वातावरण ठेवाल, तेवढेच हे वर्ष सर्वांसाठी सहज आणि सोपे होईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AhFwZQ
via nmkadda