Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १६ जुलै, २०२१, जुलै १६, २०२१ WIB
Last Updated 2021-07-16T07:47:07Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दहावी निकाल: कोकणान् केल्यान नवो इक्रम!! Rojgar News

Advertisement
SSC Result 2021: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल (Class x Result) जाहीर झाला आहे. यामध्ये एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षी कोकणच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शिक्षण बोर्डाअंतर्गत येणाऱ्या नऊ विभागांमध्ये कोकण विभाग दरवर्षी अव्वल असतो. पण यंदा कोकणाने स्वत:चाच रेकॉर्ड तोडला आहे. यंदा विद्यार्थ्यांचा रिझल्ट पाहता गुणांचा पाऊस पडल्याचे दिसत आहे. एकूण ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांची पास होण्याची सरासरी देखील मोठी आहे. यंदा कोकणचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कोकण विभागात नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३१, १६८ इतकी होती. हे सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ अमरावती विभागाचा निकाल ९९.९८ इतका लागला. त्यानंतर पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि लातूर विभागाचा निकाल ९९.९६ टक्के इतका लागला. कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के इतका तर नागपूरचा निकाल ९९.८४ टक्के इतका लागला. पूर्वी कोकण विभाग कोल्हापूर विभागात अंतर्भूत होता, तो नंतर स्वतंत्र करण्यात आला. कोकण विभागातील विद्यार्थी संख्या काही हजारांमध्ये असते आणि यशस्वी विद्यार्थ्यांची टक्केवारीही अधिक असते. असा पाहा निकाल SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा तुमचा सीट नंबर टाइप करा आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका तुमच्या स्क्रीनवर निकाल दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी प्रिट काढून ठेवा कुठे पाहाल निकाल? https://ift.tt/2U7pMIW या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त www.mahahsscsscboard.in या राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36Hmxu9
via nmkadda