Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १३ जुलै, २०२१, जुलै १३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-13T14:47:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीएमएस सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
Result: मुंबई विद्यापीठातर्फे या दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विद्यापीठातर्फे उन्हाळी सत्राच्या वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्ष बीएमएस सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला रिझल्ट पाहू शकता. करोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. परीक्षेचा निकाल ९७.२० टक्के लागला आहे. ही परीक्षा एप्रिल २०२१ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत एकूण १३ हजार ४२५ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी एकूण १६ हजार ५२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ हजार ४८१ एवढे विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तर ४१ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत बसलेल्यांपैकी ३८७ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या अभ्यासक्रमाचे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी जात असतात, त्यांच्यासाठी हा निकाल महत्वाचा आहे. निकालापूर्वी परदेशी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे गोपनीय निकाल देण्यात आलेले आहेत. कॉमर्स शाखेचा बीकॉमनंतर विद्यार्थी संख्या जास्त असणारा बीएमएस हा दुसरा अभ्यासक्रम आहे. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2eryysJ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठातर्फे उन्हाळी सत्राचे ४५ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आज बीएमएससोबत बीई सत्र ८ ( प्रॉडक्शन इंजिनियरिंग ), एमएससी ( रिसर्च ) व बीएस्सी सत्र ५ ( काम्प्युटर सायन्स ) हे निकालही जाहीर करण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hAqRli
via nmkadda