Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १७ जुलै, २०२१, जुलै १७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-17T06:47:40Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मस्तच! आयटीआयच्या १० हजार प्रशिक्षणार्थ्यांना 'ऑन जॉब ट्रेनिंग' Rojgar News

Advertisement
राज्यातील १० जिल्ह्यांमधील १२६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः १० हजार प्रशिक्षणार्थ्यांना 'ऑन जॉब ट्रेनिंग' उपलब्ध होणार आहे. कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी जर्मन ड्युएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या मॉडेलअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याकरिता व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, सिमेन्स लिमिटेड आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि त्याचबरोबर रोजगार उपलब्ध होईल, असे मलिक यांनी सांगितले. राज्यातील औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या १० जिल्ह्यांतील १२६ शासकीय आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, टूल आणि डाय मेकर, मोटार मेकॅनिक व्हेईकल, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग तसेच वेल्डर या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या आयटीआयना नजिकच्या उद्योगांशी जोडून त्याद्वारे त्या उद्योगांमध्ये उमेदवारांना 'ऑन जॉब ट्रेनिंग' उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे मलिक यांनी सांगितले. आयटीआयमधील प्रथम वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याचे, द्वितीय वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांचे 'ऑन जॉब ट्रेनिंग', तर अंतिम निकाल घोषित झाल्यानंतर एक वर्षासाठी ॲप्रेंटिशीपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही प्रभावीपणे राबवण्यासाठी सिमेन्स लिमिटेड आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हिज ट्रस्ट यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नामांकित आस्थापनांसोबत करार आयटीआयमधील पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाचा विकास करण्यासाठी विविध उद्योग स्वत:हून पुढाकार घेत आहेत. यासाठी आतापर्यंत ५०हून अधिक नामांकित औद्योगिक आस्थापनांबरोबर सामंजस्य करार करण्यात आल्याची माहितीही मलिक यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rej6EO
via nmkadda