SBI Apprentice Recruitment: एसबीआय भरती, मुदत लवकरच संपणार Rojgar News

SBI Apprentice Recruitment: एसबीआय भरती, मुदत लवकरच संपणार Rojgar News

स्टेट बॅक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच संपणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया () येत्या २६ जुलै २०२१ रोजी अर्ज प्रक्रिया संपवणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही ते अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. .co.in हे एसबीआयचे अधिकृत संकेतस्थळ आहे. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की या मुदतीनंतर ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण ६,१०० पदे भरली जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता भारतीय स्टेट बँक (SBI)मध्ये ६१०० अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत. या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०२१ ला २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा अधिक असू नये. एसबीआयने आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये सवलत दिली आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवार नोटिफिकेशन वाचू शकतात. निवड प्रक्रिया आणि स्टायपेंड एसबीआयमध्ये अप्रेंटिससाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. ऑनलाइन लेखी परीक्षेमध्ये जनरल/फायनांशिअल अवेअरनेस, जनरल इंग्रजी, क्वांटीटेटीव्ह अॅप्टिट्यूड आणि रिझनिंग अॅबिलिटी आणि कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड विषयांचे एकूण १०० प्रश्न असतील. परीक्षा १ तासाांची असेल आणि एकूण शंभर मार्कांची लेखी परीक्षेमध्ये ०.२५ निगेटीव्ह मार्किंग देखील असणार आहे. लेखी परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना स्थानिक भाषा परीक्षेसाठी निमंत्रित केले जाणार आहे. अंतिम निवड झाल्यानंतर नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना सुरुवातीस १५ हजार रुपये दरमहा स्टायपेंड देण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hVcaJM
via nmkadda

0 Response to "SBI Apprentice Recruitment: एसबीआय भरती, मुदत लवकरच संपणार Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel