Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, ११ जुलै, २०२१, जुलै ११, २०२१ WIB
Last Updated 2021-07-11T17:47:36Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SBI Recruitment Exam 2021: भारतीय स्टेट बँक ज्युनियर असोसिएट्स पूर्व परीक्षा लांबणीवर Rojgar News

Advertisement
SBI Junior Associates Recruitment 2021 Update: भारतीय स्टेट बँकेने (SBI)ज्युनियर असोसिएट्स पदांवरील भरतीसाठी (SBI Junior Associates Recruitment 2021) होणारी पूर्व परीक्षा चार केंद्रांवर स्थगित करण्यात आली आहे. काही अपरिहार्य कारणात्सव ही परीक्षा लांबणीवर पडली आहे. ज्या उमेदवारांची परीक्षा शिलाँग, आगरतळा, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि नाशिक या केंद्रांवर होणार होती, त्यांना परीक्षेसाठी ( exam) आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. या चार परीक्षा केंद्रांवर एसबीआय ज्युनियर असोसिएट्स २०२१ पूर्व परीक्षेत बसणाऱ्या सर्व उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देत राहावी. बँकेने उमेदवारांना सूचित केले आहे की, ज्या उमेदवारांना पूर्व परीक्षेसाठी वरील परीक्षा केंद्रे अलॉट केली गेली होती, त्यांना परीक्षा स्थगित झाल्याची सूचना त्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर पाठवण्यात येईल किंवा मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे सूचित केले जाईल. SBI Junior Associates exam Date अधिकृत नोटिसनुसार, बँकेने १० जुलै २०२१ पासून १३ जुलै २०२१ पर्यंत शिलाँग, आगरतळा, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि नाशिक केंद्रांवर आयोजित होणाऱ्या ज्युनिअर असोसिएट्स पदांची पूर्व परीक्षा स्थगित केली आहे. परीक्षेची सुधारित तारीख या केंद्रांसाठी नंतर जारी केली जाईल. SBI Junior Associates admit card अन्य परीक्षा केंद्रांसाठी परीक्षा नियोजित वेळेनुसार आयोजित केली जाईल. बँकेने एसबीआय क्लर्क प्रीलिम्स अॅडमिट कार्ड २०२१ वेबसाइट वर उपलब्ध केले आहे. सर्व उमेदवारांसाठी १३ जुलैच्या पूर्वी अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर लिक डिअॅक्टिव्हेट केली जाईल. अॅडमिट कार्ड २९ जून २०२१ रोजी जारी केले होते. उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये निरीक्षकांना कॉल लेटरसह ओळखपत्राची एक फोटोकॉपी दाखवावी लागेल. निवड प्रक्रिया ज्युनियर असोसिएट्स (ग्राहक सहाय्यता आणि विक्री) भारतीय स्टेट बँक (एसबीआय)मध्ये एक क्लेरिकल केडरचे पद आहे. ज्युनियर असोसिएट्सची निवड पूर्व परीक्षा, एक मुख्य परीक्षा आणि स्थानिक भाषेच्या परीक्षेच्या माध्यमातून केली जाते. ज्युनियर असोसिएट्स भरतीसाठी इंटर सर्कल ट्रान्सफर किंवा इंटर स्टेट ट्रान्सफरची तरतून नाही. येथे देखील स्थगित झाली SBI भरती परीक्षा यापूर्वी बँकेने अधिसूचित केले होते की लेह/लडाखमध्ये ज्युनियर असोसिएट भरती परीक्षा स्थगित करणअयात आली. लडाख, मणिपूर आणि विशेष अभियानांतर्गत लेह आणि कारगिल खोऱ्यातील राज्य, केंद्रशासित प्रदेशांसाठी ज्युनियर असोसिएट्स भरती पुढील सूचना मिळेपर्यंत रोखण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UGM9os
via nmkadda